महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची आज नाशिकमध्ये संयुक्त सभा होणार आहे.
मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज चार जाहीर सभा होणार असून भाईंदर, वसई, चेंबूर आणि घाटकोपरमध्ये फडणवीसांची तोफ धडाडणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात असणार आहेत. कात्रज चौकातून एकनाथ शिंदे यांचा रोड शो असणार असून दुपारी जाहीर सभा होणार आहे.
कोल्हापूरातील खराब, निकृष्ट दर्जाच्या रस्तेप्रश्नी सर्किट बेंचमध्ये २१ जानेवारीला सुनावणी होईल.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व महापालिका क्षेत्रात त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत आज सायंकाळी नितेश राणेंच्या तीन जाहीर सभा होणार असून कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचे आहे.
पुण्यात रोहित पवार आज पासून प्रचारात उतरणार असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या रोहित पवार आज पुण्यात येणार आहेत.
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी येथील मन्नाथ मंदिर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि भागवत कथेत मंडप कोसळून 12 भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे. भागवत कथा सुरू असताना अचानक वारे आल्याने मंडप कोसळला त्यामुळे भाविकांची चांगलीच धावपळ उडाली, घटनेने भाविक किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती आहे.
सातारा तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई केलेली असून पाली ता. जि. सातारा गावाच्या हद्दीत बेकायदेशीर गांजाची लागवड केले असल्याची गुप्त माहिती सहाय्यक फौजदार धनाजी वायदंडे यांना मिळाली होती.
शिंदे गटाचे नेते मिलिंद सूर्यवंशी यांच्यासह अनेक
पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
उप विभाग प्रमुख,शाखा प्रमुख, महिला आघाडी यांच्यासह एकूण 18 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
उमेदवारी न दिल्याने नाराज
सानपाडा मधील सोमनाथ वासकर आणि त्यांच्या एकाच घरात तिकीट दिल्याने आमची नाराजी असल्याचे सांगितले
मिलिंद सूर्यवंशी आणि सानपाडा मधील पदाधिकारी भाजप मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
जवळपास 18 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिल्याने खळबळ
अशोक लेलँडने उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये नवीन इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे,
या ठिकाणी इलेक्ट्रिक बसेस आणि इतर व्यावसायिक वाहने बनवली जातील, ज्यामध्ये अंदाजे ₹1,000 कोटींची गुंतवणूक झाली आहे आणि यामुळे उत्तर प्रदेशमध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असे उद्गार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले आहेत...
उत्तर प्रदेशच्या औद्योगिक क्षेत्रात आणखी गुंतवणूक आकर्षित होईल. राज्याची पर्यावरणीय उद्दिष्ट्ये साधण्यासाठी आणि त्याची एकूण औद्योगिक क्षेत्रात स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी ही सुविधा एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.
वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.
ईव्हीएम मशीन सीलबंद करण्यासाठी महापालिकेच्या प्रभाग समिती ब मधे बोलावलेल्या उमेदवारांनी केवळ भाजपचे चिन्ह कमळ आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे दोनच स्पष्ट आणि ठळक दिसत असून इतर राजकीय पक्षांचे चिन्ह आणि अपक्ष उमेदवारांची चिन्ह ही अस्पष्ट आणि संभ्रम निर्माण करणारी असल्याचा आरोप वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी केला आहे.
नलावडे यांनी महाराष्ट्र सैनिकांना लिहिलेले पत्र..
नलावडेंनी मनातील खदखद केली व्यक्त...
बीड शहरात सहयोग नगर भागात अचानक एका गोडाऊनला आग लागली अत्यंत जुने गोडाऊन असल्याने या ठिकाणी कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात साठले होते याच कचऱ्याला आग लावण्यात आली होती त्यामुळे ती आत थेट त्या गोडाऊनकडे गेली मात्र लागलीच अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करत ही आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे.
'अस्तित्व टिकवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न'
'संदीप देशपांडेंसारख्या निष्ठावंतांना पायाखाली घालण्यात आलं'
'अस्तित्व टिकवण्यासाठी मराठी मुद्दा उपस्थित केला'
प्रकाश महाजन यांचं वक्तव्य
शिवसेना कार्यकर्त्यांना पाहून भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणा
50 खोके एकदम ओके अशी घोषणा
मुंबई पालिकेच्या वॉर्ड क्र. 173 मधील घटना
सातारा जिल्ह्यातील वाईनगर परिषदेच्या निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे.
अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा दारुण पराभव करत विजय मिळवला.
राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक निवडून आले असतानाही, अवघ्या 10 नगरसेवक असलेल्या भाजपकडे उपनगराध्यक्ष पद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उपनगराध्यक्ष भाजपचाच होणार असल्याची माहिती आहे.
जर असं झालं, तर वाई नगर परिषदेत राष्ट्रवादीची स्पष्ट मेजॉरिटी असतानाही सत्ता समीकरणे उलटणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगलीच्या मिरजेत उपमुख्यमंत्री अजित पवारांची जाहीर सभा पार पडले.
शहरातल्या महाराणा प्रताप चौक मध्ये पार पडलेल्या या सभेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती.
मिरज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन देखील यावेळी अजित उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पार पडलं.
या सभेच्या माध्यमातून अजित पवारांनी सांगली महापालिका क्षेत्रातल्या समस्यांचा पाढा वाचत, राष्ट्रवादी अजित पवार गटाला संधी द्या,शहराचा चेहरा मोहरा बदलू असा आश्वासन या निमित्ताने दिले.
नाशिकच्या मालेगाव महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून सर्वच राजकीय पक्ष मतदारांच्या दारोदारी जात मतांचा जोगवा मागत असतांना एका प्रभागात प्रचार करतांना समाजवादी पार्टी व एमआयएमचे कार्यकर्ते सामोरा समोर आले मात्र दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परस्पर सामंजस्यपणा दाखवत बाजूला सरकत एकमेकांना मोकळी वाट करून दिली देत वेगळा आदर्श घालून दिला.
मराठवाड्यात 2025 या वर्षात एकूण 1129 शेतकरी आत्महत्या झाल्या असून, त्यामध्ये बीड जिल्ह्यातील 256 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत मरणाला कवटाळले आहे.
मागील 02 वर्षांपासून बीड जिल्हा मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये आघाडीवर असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
शासन व प्रशासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून, “सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण” या घोषणेच्या निषेधार्थ आज शुक्रवार दि. 09 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर " सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण" घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करण्यात आली.
पेन्शन वेळेवर न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन करू, असा धक्कादायक आणि टोकाचा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील बहुतांश निवृत्त कर्मचारी ७० वर्षांहून अधिक वयाचे असून, वाढलेल्या औषधोपचार व दैनंदिन खर्चामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मात्र, डिसेंबर २०२५चे निवृत्त वेतन अद्याप न मिळाल्याने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
मालेगावात समाजवादी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा सामंजस्यपणा...
एकमेकांना प्रचारासाठी मोकळी करून दिली वाट..
प्रचारादरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आले होते समोरासमोर..
महायुतीचा जाहीरनामा उद्या दुपारी १२ वाजता प्रसिद्ध केला जाणार …
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई अध्यक्ष अमित साटम, शिवसेना नेता राहुल शेवाळे, उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार ...
महायुतीच्या जाहीरनाम्यात मराठी भाषेसाठी अधिक प्रसारासाठीचे धोरण ...
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने महायुतीकडून मराठीसाठी विशेष कार्यक्रम राबवले येणार ...जाहीरनाम्यात मराठी शाळांच्या संख्या वाढीसाठी विशेष प्रयत्न...
मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी गारगाई धरणाची निर्मिती केली जाणार ....
मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प
क्रांतिकारी शेतकरी संघटना व युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी धडकले देवळीच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर
दिवसा वीज मिळावी यासाठी विजेच्या वेळेत बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी
उपकार्यकारी अभियंता देवळी यांच्या कार्यालयावर किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी धडकले
पाच दिवसात दिवसा बारा तास वीज न मिळाल्यास सहाव्या दिवशी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा किरण ठाकरे यांचा इशारा
बाईट - किरण ठाकरे क्रांतिकारी शेतकरी संघटना विदर्भ अध्यक्ष
गोवंशांची कत्तल करून त्यांचं मांस विक्री करणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील दोन अटल गुन्हेगारांची भंडाऱ्यात पोलिसांनी धिंड काढली. भंडारा शहरातील बैरागी वाडा आणि सौदागर मोहल्ला परिसरात राहणारे अट्टल गुन्हेगार मागील अनेक वर्षांपासून गोमांस कत्तल आणि विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्यावर कारधा पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. परवेज खान पठाण (32), आजीम कुरेशी (35) आणि असलम शेख अजिज शेख (45) असं पोलिसांनी काढलेल्यांची नावं आहे. कारधा पोलीस ठाण्यातून ही धिंड काढून भंडारा शहराच्या प्रमुख मार्गानं काढण्यात आली.
अंतिम टप्प्यातील नियोजन येणाऱ्या तीन ते चार दिवसांत प्रत्येक प्रभागात ताकतीने सभा आणि कोपरा सभांचे आयोजन.
विरोधकांचे अस्तित्व नगण्य असून ही निवडणूक एकतर्फी असल्याचा भाजपचा विश्वास.
ऑन देवेंद्र फडणवीस यांचा दौरा
उद्या होणारी देवेंद्र फडणवीस यांची सभा निवडणुकीचा 'टर्निंग पॉईंट' ठरेल.
सोलापूरची विमानसेवा, दुहेरी पाईपलाईन आणि आयटी पार्क ही फडणवीस यांची शहराला मोठी देणगी
आता बातमी येत आहे भंडाऱ्यातून....भंडाऱ्यात ED नं केली वाळू व्यावसायिकावर छापेमारी.... भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील डोंगरी बुद्रुक येथील वाळू व्यावसायिक अजय गहाणे यांच्या दुकान आणि घरावर ईडी नं ही छापेमारी केली आहे....दोन वाहनांमधून आलेल्या ईडी च्या या अधिकाऱ्यांनी सोबत सीआरपीएफचा शस्त्रधारी जवान गहाणे यांच्या घराच्या बाहेर तैनात केला आहे... सकाळपासून हे अधिकारी अजय गहाणे यांच्या दुकान आणि घरातील महत्त्वाचे कागदपत्र तपासणी करीत असल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेसचे निलंबित नगरसेवक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांना घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या भाजपला शिवसेनेने चितपट केलंय,इथे शिवसेना शिंदे गट अजित पवार गटाच्या नगरसेवकांना सोबत घेऊन अंबरनाथ नगर परिषदेत सत्ता स्थापन करणार आहेत,दरम्यान अजित पवार गटाचे चारही नगरसेवक सध्या नॉट रीचेबल आहेत,गेले अनेक दिवस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार नगरसेवक हे भाजपा सोबत होते, मात्र अचानाक १२ तासांमध्ये सूत्र हालली आणि अजित पवार गटाने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला,त्यामुळे आता शिवसेना शिंदे गट अंबरनाथ नगर परिषदेमध्ये बहुमतात येणार आहे...
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज ,, चालकाच्या लक्षात आल्यावर चालकाने ट्रक रोडच्या कडेला लावून वाचवला आपला जीव
या प्रभागातील स्थानिक रहिवाशी मनोज कोरडे यांनी २०१७ साली यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती,न्यायालयात सुनावणीनंतर ६ जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश दिला, मात्र ते घर आमच्या मालकीचे नाही आम्ही त्या घरात भाडोत्री आहोत,त्यामुळे आमचा त्याच्याशी काही संबंध नाही,शिवाय पालिकेकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे,त्यावेळी त्यात सविस्तर माहिती दिली आहे. घर अनधिकृत असेल तर ते महापालिका चौकशी करून त्यावर कारवाई करेल
अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला असून विविध राजकीय पक्षांकडून जाहीर सभांचा धडाका सुरू आहे. मात्र प्रचारासाठी महापालिकेची परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने आता वाद निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक ९ (अ) मधील उमेदवार सौरव दामोदर खंडारे व प्रभाग १२ मधील अपक्ष उमेदवार ॲड. सिद्धार्थ दंदी यांनी होल्डिंग व प्रचारासाठी परवानगी मागितली असता गेल्या दोन दिवसांपासून ती देण्यात आली नाही. यामुळे हे दोन्ही उमेदवार आज चांगलेच आक्रमक झाले.
माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या जवळच्या सहकाऱ्याच्या घराला आग
आगीत मोठे नुकसान कराड अग्निशामक दल घटनास्थळी दाखल
कराड शहरातील मध्यवस्ती शिंदे गल्ली शनिवार पेठेतील घटना
स्थानिक नागरिकांची घटनास्थळी धाव
घेत घरातील लहान मुले तसेच कुटुंबीयांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
मतदान केंद्रांसाठी 26 हजार कर्मचारी, 4100 पोलिसांचा बंदोबस्त
31 निवडणूक व्यवस्थापन कक्षाची स्थापना
पुण्यात 41 प्रभागांमध्ये होणार निवडणूक
शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता समितीची स्थापना
दक्षता समिती राज्यात कॉपी मुक्त अभियान प्रभावीपणे राबवणार
दक्षता समितीवर परीक्षांमधील गैरप्रकाराला आळा घालण्याची ही जबाबदारी
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा स्तरीय दक्षता समिती नेमली जाणार
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय दक्षता समिती नेमली जाणार
उपद्रवी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही लावले जाणार
ड्रोन कॅमेराद्वारेही परीक्षा केंद्रांवर राहणार करडी नजर
परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवणार
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचे मतदान प्रक्रियेविषयीचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक होते. तथापि, जे अधिकारी - कर्मचारी प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिले आहेत, त्यांना शनिवार १० जानेवारी रोजी अंतिम संधी देण्यात येत आहे. त्
दंतेवाड़ा पोलिसांपुढे महिला व पुरूष माओवाद्यांनी ठेवले शस्र
आत्मसमर्पितांवर होते एकूण 1 कोटी 17 लाखांचे इनाम
दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी केले माओवाद्यांच्या निर्णयाचे स्वागत
सततच्या आत्मसमर्पणामुळे छत्तीसगडमध्ये नक्षल चळवळीला घरघर लागल्याचे दिसून येते
आता बातमी येत आहे भंडाऱ्यातून....भंडाऱ्यात ED नं केली वाळू व्यावसायिकावर छापेमारी.... भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील डोंगरी बुद्रुक येथील वाळू व्यावसायिक अजय गहाणे यांच्या दुकान आणि घरावर ईडी नं ही छापेमारी केली आहे....दोन वाहनांमधून आलेल्या ईडी च्या या अधिकाऱ्यांनी सोबत सीआरपीएफचा शस्त्रधारी जवान गहाणे यांच्या घराच्या बाहेर तैनात केला आहे... सकाळपासून हे अधिकारी अजय गहाणे यांच्या दुकान आणि घरातील महत्त्वाचे कागदपत्र तपासणी करीत असल्याची माहिती समोर येत आहे.
पैसे वाटून मतदान घ्यायचे
- लोकांचे भवितव्य दावणीला बांधतो आहे
- राजकारणाचा खेळ बनवून ठेवला
- तुम्हाला उत्तम शहर घडवायचे असेल तर शिवसेना आणि मनसे हातात सत्ता द्या पुन्हा चमत्कार घडविल्या
येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. 'देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट!' अशा प्रकारचे पोस्टर सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. येत्या १४ जानेवारीपूर्वी पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे, याबाबतचे पोस्टर सोशल मिडीयावरती शेअर केले जात आहेत