Latest Marathi News Updates live: भाजप-शिंदेंमध्ये नाराजी?
नव्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी आणखी 4 दिवस वाट पाहावी लागणार
नव्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी आणखी 4 दिवस वाट पाहावी लागणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत पक्षांतर्गत प्रक्रीया पूर्ण होईल. त्यापूर्वी भाजप आमदारांची बैठक होईल, त्यानंतर आमदारांचं म्हणणं पक्षश्रेष्ठींना कळवलं जाईल. पक्षांतर्गत प्रक्रीया आणि बैठकीनंतर शपथविधीसाठी वाट पाहावी लागणार आहे.
भाजप-शिंदेंमध्ये नाराजी?
भाजप-शिंदेंमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री पदावरून नाराजी असल्याचं बोललं जात आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात दुरावा? आला आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. २६/११च्या शहीद श्रद्धांजली कार्यक्रमात एकमेकांकडे पाहणं टाळलं. शिंदे आणि फडणवीसांच्या देहबोलीतून नाराजीचा स्पष्ट संदेश मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात राजीनामा देणार
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार असल्याचं कळतंय. राज्यपालांकडे CMपदाचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत. तसेच शपथविधी पार पडेपर्यंत शिंदे राहणार काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वरळी अपघात प्रकरणी आरोपींना दिलासा नाहीच
वरळी अपघात प्रकरणी आरोपींना दिलासा नाहीच. मिहीरची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. मिहीरसह चालकाची अटक कायदेशीर असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे.
महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून पेच कायम
महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून पेच कायम आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप अनुकूल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळावं यावर शिंदे ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाकडून रश्मी शुक्लांना पदाभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आचारसंहिता संपताच रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला आजच पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या पराभूत झालेल्या उमेदवारांची आज मातोश्रीवर बैठक
ठाकरेंच्या शिवसेनेच्या पराभूत झालेल्या उमेदवारांची आज मातोश्रीवर बैठक होणार आहे. विजयी आमदारांच्या बैठकीनंतर दुपारी 12.30 वाजता मातोश्रीवर उमेदवारांची बैठक होणार आहे. पराभूत उमेदवारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजीनामा देणार-सूत्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपालांकडे CM पदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता आहे. शपथविधी पार पडेपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार असल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता आहे.