अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची बैठक सुरुच
अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची बैठक सुरुच
अंतरवाली सराटीमध्ये अजुनही जरांगेंची बैठक सुरुच आहे. मुंबईमध्ये 23 जागा पाडणार असल्याचा जरांगेंनी निर्धार केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मनोज जरांगेंची रणनीती ठरल्याची माहिती मिळत आहे.
शरद पवारांचा दोन दिवसीय विदर्भ दौरा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. 7 तारखेला नागपूरमध्ये प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. 8 तारखेला हिंगणघाट, जिंतूर, वसमतमध्ये सभा असणार आहेत.
महायुतीच्या प्रचाराचा नारळ 5 नोव्हेंबरला फुटणार
महायुतीच्या प्रचाराचा नारळ 5 नोव्हेंबरला फुटणार आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीची पहिली संयुक्त सभा होणार आहे. सभेला महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत.
शिवसेनेच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. कुर्ला-नेहरुनगर आणि अंधेरीत शिंदेंच्या सभा होणार आहेत. मंगेश कुडाळकर आणि मुरजी पटेलांसाठी शिंदेंच्या सभा होणार आहेत.
हसन मुश्रीफ यांनी मनोज जरांगेंची घेतली भेट; चर्चांना उधाण
मंत्री हसन मुश्रीफ यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुश्रीफ अचानकपणे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. हसन मुश्रीफ आणि जारांगे यांच्यात चर्चा झाली असून, विधानसभा निवडणुकीत जरांगे यांनी पाठिंबा द्यावा यासाठी भेट घेतल्याचे कळतेय.
यवतमाळ-विदर्भात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
यवतमाळ-विदर्भात राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. 5 नोव्हेंबरला राज ठाकरेंची यवतमाळ जिल्ह्यातील वणीमध्ये जाहीर सभा आहे. वणी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सभा होणार आहे.
श्रीनगरच्या लाल चौकात हॅण्ड ग्रेनेडचा स्फोट
जम्मू-काश्मीरमध्ये हॅण्ड ग्रेनेडचा मोठा स्फोट झाला आहे. श्रीनगरच्या लाल चौकात हॅण्ड ग्रेनेडचा स्फोट झाला आहे. स्फोटात 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दहशतवादी हल्ला केल्याची माहिती मिळतेय.
मंत्री हसन मुश्रीफांनी घेतली मनोज जरांगेंची भेट
मंत्री हसन मुश्रीफांनी घेतली मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुश्रीफांच्या अचानक भेटीनं चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभेत जरांगेंनी पाठिंबा देण्यासाठी भेट? घेण्यात आली आहे का असा सवाल विचारला जात आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला 'वर्षा'वर दाखल झाले आहेत. दोघांमध्ये बंडखोरीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
मुंबईच्या 36 जागांपैकी 11 जागा काँग्रेसच्या वाट्याला
मुंबईच्या 36 जागांपैकी 11 जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. 2019 मध्ये काँग्रेसने 30 जागा लढवल्या होत्या. 11 जागांपैकी बहुतांश जागा भाजपच्या बालेकिल्ल्यात आहेत. पराभूत होणाऱ्या जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.