Latest Marathi News Update live : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची टिळक भवन येथील बैठक

Latest Marathi News Update live : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची टिळक भवन येथील बैठक

भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंची सपत्नीक मंत्रालयात भेट

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची टिळक भवन येथील बैठक

सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत व प्रांताध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या खासदारांची बैठक. त्यानंतर दुपारी २ वाजता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत व प्रांताध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात पत्रकारांना धमकी आणि दबाव

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराबद्दल अर्वाच्य भाषा वापरुन,पत्रकार परिषदेत जाहीरपणे धमकी दिल्या बाबत धाराशिव जिल्ह्यातील विविध संघटनेच्या पत्रकारांनी एकत्र येत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलय.

'राज्य सरकार प्रत्येक शेतकऱ्याला 6 हजार देणार', मुख्यमंत्र्यांची घोषणा

नाशिकमध्ये झालेल्या शिवसेना (UBT) च्या शिबिरात आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. "गद्दार गँगचा नेता आज अमरावतीहून आपल्या गावी जाणार, चंद्र कुठून निघाला माहित नाही, पण नाराजी नाट्य सुरू झालं आहे," असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटावर निशाणा साधला.

सोन्याच्या दरात 1 हजार 300 रुपयांची वाढ, सोन्याचे भाव विक्रमी 97 हजार 500 रुपयांवर

मुंबई भाजपच्या अंतर्गत निवड प्रक्रियेला वेग, मुंबई भाजपच्या प्रमुख नेत्यांची उद्या दादर येथील वसंत स्मृती येथे बैठक

फडणवीस अमरावतीतील मामांच्या घरी दाखल

आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांनी केलं भल्या मोठ्या हाराने देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत

अ‍ॅम्बी व्हॅलीवर ईडीकडून टाच, सहारा समूहप्रकरणी कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन

तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत

फडमालक, कलाकार, वादक यांच्यासमोरील समस्या समजून घेऊन, पारंपरिक लोककला टिकवून ठेवण्यासाठी समिती उपाययोजना सुचवणीर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com