राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61 व्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन ठाण्यातील दीप बंगला येथे करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली.
लाडक्या बहिणींचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खास गिफ्ट
महाराष्ट्रातील लाडक्या बहीणींनी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 61 किलोचा केक दिला आहे. या केकवर लाडका भाऊ, लाडका मुख्यमंत्री, एकनिष्ठ दिघे साहेबांचा शिवसैनिक असे अनेक टॅग लिहिले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीचे मनसेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
केजरीवालांच्या पराभवाने अण्णा हजारेंना आनंद - संजय राऊत
दिल्लीमधील भाजपाच्या विजयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
पक्षवाढीसंदर्भात बैतकीत चर्चा केली - संदीप देशपांडे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीमध्ये पक्षवाढीसंदर्भात चर्चा झाली असल्याचे सांगितले गेले.