मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
मुंबईतील मिलिंद नगर, पवई-व्हेंचुरी येथील 1800 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या जोडणीवरील ३०० मिलीमीटर व्यासाच्या पर्यायी bypass शुक्रवारी अचानक मोठी गळती आढळून आली आहे. त्यामुळे घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयास होणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद झाला आहे. जलवाहिनी दुरुस्ती काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून त्यास १५ तासांचा कालावधी अपेक्षित आहे. यामुळे एन व एल विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा आज शुक्रवार, सायंकाळी ०५ वाजेपासून शनिवार सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
मध्य रेल्वेवर 15 तास, तर पश्चिम रेल्वेवर 13 तासांचा मेगाब्लॉक
इंद्रजित सावंत यांना धमकी, प्रशांत कोरटकरवर बेलतरोडी पोलिसांत गुन्हा दाखल
इंद्रजित सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजां बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी प्रशांत कोरटकरवर आता नागपुरातील बेलतरोडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला..
ठाकरेंच्या खासदारांची आज मातोश्रीवर बैठक
भवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीची लगबग
नव्या मंत्र्यांचे दालन सुशोभीकरण, रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात . उपमुख्यमंत्री शिंदेंचं दालन पूर्ण तर मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या रंगरंगोटीचं काम सुरु आहे. विधान भवनात ३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे महायुती २.० सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे
सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय - अजित पवार
विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार-संजय राऊत
नागपूरमध्ये राबवली स्वाक्षरी मोहीम
महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा न्यायालयाचा निकाल दुपारनंतर लागणार
कुटुंबाला काही झाल्यास इंद्रजीत सावंत जबाबदार - पल्लवी कोरटकर
प्रशांत कोरटकरची पत्नी पोलिस ठाण्यात दाखल
संतोष देशमुख प्रकरणात विष्णु चाटेच्या नावाचाही समावेश
संतोष देशमुख प्रकरणात वाल्मीक कराड मास्टरमाइंड
समोर आलेल्या आरोपपत्रामध्ये वाल्मीक कराडच्या विरोधात सबळ पुरावे