Latest Marathi News Updates live: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींचं बँक खातं गोठवलं-सूत्र

Latest Marathi News Updates live: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींचं बँक खातं गोठवलं-सूत्र

अमरावतीच्या आडगाव विचोरी गावात शालेय पोषण आहारातून विद्यार्थांना विषबाधा

अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील आडगाव विचोरी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींचं बँक खातं गोठवलं-सूत्र

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हत्या प्रकरणातील फरार आरोपींचं बँक खातं गोठवण्यात आल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. वाल्मिक कराडचही बॅंक खातं गोठवण्यात आल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पालघरच्या बोईसर तारापूर MIDCतील कारखान्यात भीषण आग

बोईसर तारापूर एमआयडीसीतील तीन कारखाने आगीच्या भक्षस्थानी . युके ॲरोमॅटिक्स , श्री केमिकल नंतर आदर्श टेक्स्टाईलला आग . अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल . डहाणूतील अदानी पावर स्टेशन मधील अग्निशमन दलाला देखील पाचारण .

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातील आरोपींचे बँक खाते गोठवल्याचे आदेश दिले होते. याच अनुषंगाने देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या बँक खात्यासह वाल्मीक कराड यांचे देखील बँक खाते गोठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांकडून याबाबत माहिती मिळत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने रचला इतिहास

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचलाय. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचे द्विशतक पूर्ण केलंय. जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला आऊट करून ही खास कामगिरी केली.

मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर अपघात

मुंबई - कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 6 वरील रिधोरा जवळ गॅस टेंकर पलटी झाल्याची घटना घडलीय. अकोल्याच्या दिशेने येणारा हा टेंकर अचानक पालटला .या मधील चालक आणि त्याचा सहकारी हे दोघे जखमी झाले आहेत.

लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये कधी जमा होणार- आदित्य ठाकरे

लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये कधी जमा होणार असा आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला खोचक टोला लगावला आहे.

बारामतीत अजित पवारांचा 20 हजार मतांनी पराभव- उत्तम जानकर

बारामतीत अजित पवारांचा 20 हजार मतांनी पराभव झाला असल्याचा उत्तम जानकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. महायुतीने 150 विधानसभा मतदारसंघात गडबड केल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.

बीड प्रकरणात सरकार कुणाला वाचवतंय? - आदित्य ठाकरे

बीड प्रकरणात सरकार कुणाला वाचवतंय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. मला वाटलं होतं की मुख्यमंत्री कारवाई करतील. पण कोणतीही कारवाई केली नाही' अशी आदित्य ठाकरे यांनी खंत व्यक्त केली आहे.

तो बडा नेता कोण? - दमानिया

तो बडा नेता कोण? तात्काळ नाव जाहीर करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीला सापडले 2 मोबाईल

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीला 2 मोबाईल सापडले. मोबाईलवरून हत्येचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. त्याच मोबाईलवरुन एका बड्या नेत्याला फोन केल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षांची चौकशी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डांच्या हस्ते सत्कार

टाटा समूहाची देशातल्या तरुणांना गूड न्यूज

टाटा समूहाची देशातल्या तरुणांना गूड न्यूज

येत्या 5 वर्षात देणार 5 लाख नोकऱ्या

टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांचा आपल्या कर्मचाऱ्यांना निरोप

गुजरात मधील रासायनिक कारखान्यातील विषारी वायूच्या गळतीमुळे ४ कामगारांचा मृत्यू

गुजरात मधील रासायनिक कारखान्यातील विषारी वायूच्या गळतीमुळे ४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. भरुच जिल्‌ह्यातील दहेज येथील रासायनिक प्लांटमध्ये विषारी वायू गळतीने हा अपघात झालाय. पाईपमधून गॅस गळतीमुळे हे चार कामगार बेशुद्ध पडून त्यांचा मृत्यू झाला. प्रकरणात पोलिसांनी चौकशी सुरू केलीय.

शरद पवार यांनी केली कृषी विज्ञान केंद्राची पाहणी

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी त्यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात पाहणी केली. कृषी विज्ञान केंद्रात 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याची पाहणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलीये.

जालन्यात व्यापाऱ्याची साडेबारा लाखाची बॅग अज्ञातांनी पळवली

जालना शहरातील जुना मोंढा भागात एका व्यापाऱ्याची साडेबारा लाखाची बॅग अज्ञातांनी लंपास केल्याची घटना घडलीय. दुचाकीवर आलेल्या 4 ते 5 अज्ञात चोरट्यांनी व्यापाऱ्याला मारहाण करत व्यापाऱ्या जवळील साडे बारा लाख रुपये असलेली बॅग हिसकावून घेत पळ काढलाय.

गुजरात मधील रासायनिक कारखान्यातील विषारी वायूच्या गळतीमुळे ४ कामगारांचा मृत्यू

गुजरात मधील रासायनिक कारखान्यातील विषारी वायूच्या गळतीमुळे ४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. भरुच जिल्‌ह्यातील दहेज येथील रासायनिक प्लांटमध्ये विषारी वायू गळतीने हा अपघात झालाय. पाईपमधून गॅस गळतीमुळे हे चार कामगार बेशुद्ध पडून त्यांचा मृत्यू झाला. प्रकरणात पोलिसांनी चौकशी सुरू केलीय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com