मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल
आयुक्त भूषण गगराणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
सरकारच्या १०० दिवसांच्या विकास आराखड्याच्या नियोजनाची बैठक
बैठकीला पालिका आयुक्तांची उपस्थिती
लोणावळ्यातील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे पर्यटकांना बंदी
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्याने पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. असे आदेश वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिलेत.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका दाखल
संतोष देशमुख हत्येप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.
बीड: जिल्हा वासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न विघनवाडी ते राजुरी पर्यंत रेल्वे चाचणी पूर्ण
बीड वासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या रेल्वेची चाचणी आज विचार बीड जवळील राजुरी पर्यंत करण्यात आली खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत चाचणी झाली असून रेल्वेच्या अधिकाऱ्यांना यापुढील रेल्वे मार्ग बाबत खासदार सोनवणे यांनी सूचना केले आहेत.
बीड सरपंच हत्येप्रकरणी CIDकडून एका महिलेची चौकशी
बीड सरपंच हत्येप्रकरणी CIDकडून एका महिलेची चौकशी. महिलेचं बँक खातंही केलं फ्रीझ
रेड्यांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना ताब्यात. घेऊन 28 लाख 58 हजाराचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असतानाच आता रेड्यांची तस्करी करणाऱ्या वाहनासह पाच जणांना घाटंजी पोलिसांनी ताब्यात घेतले. घाटंजी पोलिसांनी सापाळा रचून रेड्यांची तस्करी करणाऱ्या फजल नजरेलाई आहिल आपताब, बिलाल अहमद, अब्दुल फैजान या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले तर रेडे आणि वाहन असा 28 लाख 58 हजार रुपयाचा मुद्देपाल जप्त करण्यात आला .यामध्ये 22 रेडयांची सुटका करण्यात आली.
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी
विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड पवई वरून कांजुरमार्गच्या दिशेने जाणारी बेस्ट बस मध्येच बंद पडली त्यामुळे लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण
संभाजीराजेंचं राज्यपाल राधाकृष्णन यांना पत्र
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय... शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ देण्याची यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे मागणी करण्यात आलीय.
सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी प्रकरणात माफी मागितली
भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावरून दिलगिरी व्यक्त केली आहे. सर्व स्तरातून टीकेचा भडीमार झाल्यानंतर अखेर सुरेश धस यांना याबाबत माफी मागावी लागली आहे.
जालन्यातील मोसंबी मार्केट 5 जानेवारी पर्यंत बंद. जालन्यात शेतकऱ्याने पाच जानेवारीपर्यंत मोसंबी मार्केटला आणू नये. जयपूर आणि दिल्ली येथील मोसंबी मार्केट बंद असल्याने जालना मोसंबी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय.
वाशिम जिल्ह्यात ऑनलाइन फसवणूकीत वाढ
वाशिम जिल्ह्यात या वर्षात जानेवारी ते २८ डिसेंबर २०२४ या कालावधीत सायबर चोरट्यांनी ७०६ घटनांमधून तब्बल ४ कोटी ५७ लाख ६९ हजार रुपयांवर हात साफ केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला बच्चू कडू देणार कोर्टात आव्हान
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला बच्चू कडू कोर्टात आव्हान देणारेत. तर बच्चू कडू यांनी व्हीव्हीपॅटवरही टीका केलीये. बच्चू कडू यांचा अचलपूर विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला.