वाल्मिक कराड समर्थकांना पोलिसांचा न्यायालय आणि पोलीस ठाणे परिसरात येण्यास मज्जाव करण्य़ात आलाय. वाल्मीक कराड यांना काही वेळातच केज येथील न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
वाल्मीक कराड याला साधारण आठ वाजता केज न्यायालयात हजर केले जाणार असून त्यानंतर ही सुनावणी होणार आहे. सीआयडीच्या माध्यमातून केज न्यायला यावर आज सुनावणी घेण्यासाठी विनंती करण्यात आली होती. आणि ही विनंती केज न्यायालयाने मान्य केली असून या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत सुनावणी होईल.
नागपूरमध्ये 31 डिसेंबर निमित्त दारू सोडा दूध प्या हा उपक्रम राबवण्यात आला. नागपूरच्या व्हेरायटी चौकात याचं आयोजन करण्यात आलंय.
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनवर पोलिसांची करडी नजर आहे. कल्यामध्येही पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात. थर्टीफर्स सेलिब्रेट करा नववर्षाचं उत्साहात स्वागत करा मात्र कुठेही या सेलिब्रेशनला गालबोट लागता कामा नये यासाठी पोलिस काळजी घेताना दिसताय.
अमरावती जिल्ह्यात 3 दिवस ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या निषेधार्थ अमरावतीत ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय. 3 दिवस ग्रामपंचायत बंद राहणार असल्याने कामे रखडणार.
रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरुन सुनील तटकरेंनी संताप व्यक्त केलाय...माणगाव तहसील कार्यालयातील आढावा बैठकीत तटकरेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं...समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं अधिकाऱ्यांची कानउघडणी केलीय...तटकरे एवढ्यावरच थांबले नाहीत भरसभेत एक तास उभे रहा अशी शिक्षाही अधिकाऱ्यांना केली...
भाजप आमदार सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत..सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा धस यांनी आरोप केलाय. 3 आठवडे उलटूनही वाल्मिक कराड अद्याप फरार आहे. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नेमणूक करण्याचीही मागणी सुरेश धस मुख्यमंत्र्यांना करणार आहेत.
पुण्यातील कात्रज घाटामध्ये अज्ञाताकडून गोळीबार
ससून रुग्णालयात काम करणाऱ्या वॉर्ड बॉयवर गोळीबार
गोळीबारात दीपक लोकर गंभीर जखमी
रात्रीच्या सुमारास गोळाबाराची घटना घडल्याची माहिती
गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला वाल्मीक कराड अखेर आज पुण्यात सीआयडी पोलिसांना शरण आला