Latest Marathi News Updates live : बाहेरच्या लोकांनी नागपूरमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केला नागपुर आमदार प्रवीण दटकेंचा आरोप

Latest Marathi News Updates live : बाहेरच्या लोकांनी नागपूरमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केला नागपुर आमदार प्रवीण दटकेंचा आरोप

अजित पवार आणि सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. विधान परिषदेसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही नेते फडणवीसांच्या भेटीला गेले असून भेटीचे कारण अस्पष्ट आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

छत्रपती संभाजीनगर येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे पत्र देऊन घोषणाबाजी करण्यात आली. गळ्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल चे रुमाल घालून हिंदुत्ववादी संघटना आल्या होत्या.

प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी

अंबरनाथच्या महामार्गावर भरधाव टेम्पोची रुग्णवाहिका आणि इतर चार गाड्यांना धडक

आव्हाड आणि मंत्री शिरसाट यांची गळा भेट

विधान परिषद निवडणुकीसाठी एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज

पुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन...

कोरटकर प्रकरणात कोल्हापुर सत्र न्यायालय उद्या निकाल देणार

प्रशांत कोरटकरला बेल की जेल ?

मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.

नवी मुंबईत औरंगजेबाच्या कबरीविरोधात बजरंग दल आक्रमक

नवीन शिक्षक संच धोरणाला शिक्षक संघटनांचा विरोध   

भारती पवार यांचे दुःखद निधन! पवार कुटुंबावर दुःखाचे डोंगर

नागपूर पेटलं! कबरीच्या वादातून 2 गटांमध्ये दगडफेक

नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात दगडफेक करण्यात येत आहे. काही नागरिक आणि दोन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांचा फौज फाटा घटना स्थळी दाखल झाली असून सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून शांततेच आवाहन करण्यात येत आहे.

बाहेरच्या लोकांनी नागपूरमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केला नागपुर आमदार प्रवीण दटकेंचा आरोप

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com