Latest Marathi News Updates live : नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री येणार नागपूरात
Published on:
राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या घोषणेवर खासदार सुप्रिया सुळे यांची टीका
सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसे आक्रमक
नवी मुंबईतील विविध ठिकाणी सिडकोतर्फे २६ हजारोंच्या घरांची यादी जाहीर करण्यात आली आहे.. मात्र सिडकोच्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाही, त्यामुळे मनसे आक्रमक झाली असून सिडकोने घरांच्या किमती कमी करावे अशी मागणी केली होती . मात्र सिडको प्रश्नाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे नवी मुंबई मनसेने आता आंदोलनाची भूमिका हाती घेतली आहे.मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वात सिडको प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण पुकारण्यात येणार आहे.. पत्रकार परिषद घेऊन मनसेने याची माहिती दिली आहे..
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात 'प्रत्यय' ऑनलाइन प्रणालीची अंमलबजावणी
राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होणार असून, त्यादिशेने आज प्रत्यय ही पेपरलेस रिव्हिजन व अपील प्रणाली सुरू महसूल विभागाने आज महत्वाकांक्षी पाऊल टाकले. प्रत्यय प्रणालीमुळे फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलकन अर्ज आदी विषय ऑनलाईन पद्धतीने हाताळता येतील.
वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमीनी काढून घेणार - चंद्रशेखर बावनकुळे
राज्यात अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाने जमिनी बळकावल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. याबाबत केंद्रीय स्तरावर कायदा करण्याचे काम सुरु आहे. मात्र, खासगी आणि देवस्थानच्या जमीनी वक्फ बोर्डाने बळकावल्या असल्याचे आढळून आले तर त्या काढून घेतल्या जातील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.
दिशा सालियनच्या वडिलांची याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारली
नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री येणार नागपूरात