विजापूरच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी आतापर्यंत 12 नक्षलवाद्यांना ठार केल्याची माहिती समोर आली आहे.
मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा आज जबाब घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात 164 प्रमाणे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब घेतला जाणार आहे त्यातील धनंजय यांचा आज जबाब घेतला जाणार आहे त्यानंतर संतोष देशमुख यांच्या पत्नीचा देखील जबाब होणार आहे.
२०२३ मध्ये राज्य सरकारला कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल करण्याची गरज का पडली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. यासंदर्भात राजेंद्र मात्रे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेतील आरोपात तथ्य असल्याचे निरीक्षण नोंदवीत न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने सरकारला दोन आठवड्यांत स्पष्टीकरण मागितले आहे. कृषी विभागाने ५ डिसेंबर २०१६ रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू केली होती. २०२३ मध्ये मुंडे हे कृषीमंत्री असताना यात बदल झाला.
पाकचे माजी पंतप्रधान इमरान खानला 14 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. इमरान खानच्या पत्नी बुशरा बीबी यांनाही 7 वर्षांची शिक्षा सुनवण्यात आली आहे. अल-कादिर ट्रस्टमधील भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पुणे- नाशिक महामार्गावर भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर आहेत. रोहिंग्या प्रकरणात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. मालेगावातील रोहिंग्या प्रकरणात SIT गठीत केल्याची माहिती मिळत आहे.
त्याचवेळी पोलीस कारवाई झाली असती, तर माझा भाऊ वाचला असता अशी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी खंत व्यक्त केली आहे.
चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापूर गावातून वीज केंद्राला रोप वे च्या माध्यमातून कोळसा पुरवला जातो. हा रोप वे चाळीस वर्षे जुना आहे. त्यामुळे कोळशाची धूळ आणि आवाज याचा त्रास येथील लोकांना सहन करावा लागतो आहे. चंद्रपूरच्या जनतेने वीज निर्मितीसाठी सहकार्य करायचे आणि सरकारने आम्हाला माती खायला लावायची, असे चालणार नाही, असा खरमरीत इशारा भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारला दिला.
शेतकऱ्यांसाठीच्या कृषी साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आल्याने कृषीमंत्री धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. डीबीटी योजना का बंद केली? असा नागपूर खंडपीठामध्ये दाखल याचिकेवर सरकारला सवाल विचारण्यात आला आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांनी करिना कपूरचा जबाब नोंदवला आहे. हल्ला झाला त्यावेळी घरामध्ये नक्की कोण कोण होतं. या संदर्भात पोलिसांनी करीना कपूर हिला विचारणा केली. यावेळी करीनाने हल्ल्याच्या वेळी घडलेली संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली.
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोर आला आहे. वांद्रे स्टेशनवर हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ओळख लपवण्यासाठी आरोपीने कपडे बदलले होते असल्याची माहिती समोर आली आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणात आतापर्यंत 14 जणांची चौकशी करण्यात आली आहे. सैफच्या घरात काम करणारे सुरक्षा रक्षक, नोकर सर्वांची चौकशी करण्यात आली आहे. घटनेच्या दिवशी सर्व व्यक्ती कुठे होती? पोलिसांनी माहिती घेतली आहे. सर्व व्यक्तींचे पोलिसांनी कॉल रेकॉर्ड घेतल्याची माहिती मिळत आहे.