Latest Marathi News Updates live:  शेतकऱ्याच्या घरावर दरोडा

Latest Marathi News Updates live: शेतकऱ्याच्या घरावर दरोडा

महाराष्ट्रातील सहा ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार

पंचायत राज पुरस्कारात महाराष्ट्र शासनाला ६ पुरस्कार प्राप्त

तत्कालीन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पुरस्कार प्राप्तीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समित्यांचे अभिनंदन

२०२२ ते २०२४ काळातील कामासाठी केंद्राकडून महाराष्ट्राचा सन्मान

दीनदयाळ उपाध्याय पंचायत पुरस्कार, नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत पुरस्कार, ग्राम ऊर्जा विशेष पुरस्कार, कार्बन न्यूट्रल कंट्रोलसह इतर पुरस्कारांनी महाराष्ट्र सन्मानित

विरोधी पक्षातील आमदारांचा आज शपथ घेण्यास विरोध

विरोधी पक्षातील आमदारांचा आज शपथ घेण्यास विरोध. विशेष अधिवेशनात EVM च्या मुद्यावर विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक

लग्नसमारंभात रोकड चोरणाऱ्या सिसोदिया टोळीच्या चोरट्याला MHB पोलिसांकडून अटक

मुंबईच्या बोरिवली पश्चिम MHB पोलिसांनी सिसोदिया टोळीच्या एका चोरट्याला अटक केली आहे. जो लग्नसमारंभात रेकी करून वधू-वरांकडून रोख रक्कम चोरून पळून जात असे. या चोरट्यांनी MHB पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंक रोडवर असलेल्या एका लग्नात डल्ला मारून एक लाख रुपयांची रोकड चोरून पलायन केले. MHB पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर MHB पोलिसांनी हॉलमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही तपासात आरोपी चोरीचे बंडल घेऊन जाताना दिसले. एमएचबी पोलिसांनी आरोपीला बोरिवली येथून अटक केली

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष EVMच्या विरोधात आता जाणार सुप्रीम कोर्टात

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष EVMच्या विरोधात आता जाणार सुप्रीम कोर्टात

प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांची वेळ घेणार

सिंघवी यांना भेटून कायदेशीर सल्ला घेणार असल्याची माहिती

ईव्हीएमच्या विरोधात कायदेशीर लढाई देण्याची विरोधी पक्षांकडून तयारी

कोर्टाने EVM विरोधातील याचिका फेटाळल्याने आता कायदेशीर अभ्यास करून कोर्टात जाणार

पुष्पा 2 सिनेमाला पायरसीचा फटका?

पुष्पा 2 सिनेमाला पायरसीचा फटका? सिनेमा नावाच्या अॅपवर पुष्पा 2 सिनेमा लीक झालाय. पुष्पा 2 सिनेमा लीक झाल्याची बातमी सर्वात आधी लोकशाही मराठीवर.

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने केली 12 ते 13 मंत्रीपदांची मागणी

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने 12 ते 13 मंत्रीपदांची मागणी केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी वक्तव्य केलं आहे. आमचे ६० आमदार निवडून आले आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला १२ ते १३ मंत्रीपदे मिळायला हवीत असं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलं आहे.

माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड पंचत्त्वात विलीन

माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचं पार्थिव पंचत्त्वात विलीन झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. शुक्रवारी सायंकाळी त्यांचं वयाच्या 84व्या वर्षी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून पिचड यांच्यावर उपचार सुरू होते. ब्रेन स्ट्रोकमुळे दोन महिन्यांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष EVMच्या विरोधात आता जाणार सुप्रीम कोर्टात

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष EVMच्या विरोधात आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे. प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांची वेळ घेणार आहेत. सिंघवी यांना भेटून कायदेशीर सल्ला घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांच्या शिलेदाराचा अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शिवसेना नेते गुलाबराव पाटलांविरोधात गुलाबराव देवकरांचा पराभव झाला होता.

खासदार सुरेश म्हात्रे यांनी घेतली केंद्रीय मंत्री गडकरींची भेट

भिवंडीतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून या वाहतूक कोंडी कडे केंद्र शासनाने विशेष लक्ष द्यावे व येथील वाहतूक कोंडी व रस्त्यांच्या समस्येतून भिवंडीकरांची सुटका करावी या मागणीसाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

शरद पवारांच्या शिलेदाराचा अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय

माजी मंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार

शिवसेना नेते गुलाबराव पाटलांविरोधात गुलाबराव देवकरांचा पराभव

चंद्रपूरच्या पारडी जिल्हा परिषद शाळेत खिचडीतून विषबाधा

विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणातील सखोल चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. सावली तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत खिचडीतून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावे, अशाही सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पुणेकरांचा प्रवास होणार महाग

सर्वसामान्य पुणेकरांचा प्रवास महाग होणार आहे. पुणे पीएमपीची तिकीट दरवाढ होणार असल्याची शक्यता आहे. पीएमपीच्या तोट्याचा वाढता आलेख पाहता हा निर्णय घेण्यात येत आहे. 2016 मध्ये पीएमपीची शेवटची तिकीट दरवाढ करण्यात आली होती.

शिवसेनेचे आामदार आमश्या पाडवींना जामीन मंजूर

नंदूरबार जिल्ह्यातील शहादा न्यायालयाचा आमश्या पाडवींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्याच आली आहे. आदिवासी महिलेला शिविगाळ केल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.

शेतकऱ्याच्या घरावर दरोडा

नाशिकच्या देवळा तालुक्यातील निंबोळा येथील शेतकरी श्री. अनिल भाऊराव निकम यांच्या घरात दरोडेखोरांनी मोठी चोरी केली आहे. घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी 12 तोळे सोनं आणि 20 हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. हे निकम कुटुंब घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

दिल्लीमध्ये 2 केंद्रीय मंत्र्यांचा रॅम्पवॉक

दिल्लीमध्ये 2 केंद्रीय मंत्र्यांचा रॅम्पवॉक केला आहे. केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे आणि सुकांता मुजूमदार रॅम्पवर थिरकले आहेत. भारत मंडपममध्ये केंद्रीय मंत्री थिरकले आहेत. अष्टलक्ष्मी महोत्सवात मंत्र्यांनी रॅम्पवॉक केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com