Latest Marathi News Updates live: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावात जमावबंदी
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावात जमावबंदी
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावात जमावबंदी करण्यात आली आहे. बेळगावात पाच ठिकाणी जमावबंदी करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे.
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार तर दुसरा कोणत्याही पक्षाचा अर्ज दाखल नाही तसेच दुपारी १२ पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावतो
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावतो आहे. उपनगरांमध्ये हवेतील सूक्ष्मकण PM2.5 ची पातळी 100 µg/m³ पेक्षा अधिक तर शनिवारी ही पातळी १००µg/m³ इतकी नोंदवण्यात आली. पातळी राष्ट्रीय सुरक्षित मर्यादिपेक्षा खूप जास्त या प्रदूषणाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तर त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणं आहे.
भाजप सरकारची ब्रिटिश काळापेक्षा गंभीर हुकूमशाही- पृथ्वीराज चव्हाण
नुकत्याच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम व अन्य निवडणूक प्रक्रियेमध्ये झालेल्या संशयास्पद कारभाराबाबत आवाज उठवला तर कारवाई करण्यात येत आहे, त्यामुळे भाजप सरकारची ब्रिटिश काळापेक्षा गंभीर हुकूमशाही आहे असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज रविवारी आठ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आरोप केला.
MLA Oath; सदा सरवणकर यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; अमित ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ
विधानसभा उपाध्यक्षपदाची मविआची मागणी
भास्कर जाधव, नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेतेपद आणि विधानसभा उपाध्यक्षपदाची मविआने मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत मविआ नेत्यांची मागणी.
MLA Oath; मुर्जी पटेल यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; राजन नाईक यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; मनोज कायंदे यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; संदिप शिरसागर यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; रोहित पवार यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; दिलीप बनकर यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; संजय पोतनीस यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; प्रताप सरनाईक यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; रवी राणा यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; प्रशांत बंब यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; सुरेश धस यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; आदित्य ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; तानाजी सावंत यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; अमित देशमुख यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; विजय वडेट्टीवार यांनी घेतली आमदारकीची शपथ
नाना पटोलेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
MLA Oath; अब्दुल सत्तार यांनी घेतली आमदारकीची शपथ
निवडणुकीसंदर्भात लोकांच्या मनात शंका - शरद पवार
मारकडवाडीत पवारांकडून बाबासाहेबांना अभिवादन
MLA Oath; भास्कर जाधव यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath; मंगल प्रभात लोढा यांनी घेतली आमदारकीची शपथ
MLA Oath नाना पटोले यांनी घेतली आमदारकीची शपथ
राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज करणार दाखल
राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्याची भाजप कार्यकर्त्यांना दमबाजी
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात दोन गट आमने सामने आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी आमदार राम सातपुते यांचा बॅनर झाकण्याचा प्रयत्न केला असता सातपुते गटाच्या कार्यकर्त्यांनी बॅनर झाकण्यास विरोध केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर पक्षाचे पदाधिकारी मधुकर पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दमबाजी केली.
शरद पवार मारकडवाडीत दाखल
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज माळशिरसमधील मारकडवाडी गावचा दौरा करणार आहेत. या गावात ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवण्यात आला होता
मविआच्या आमदारांची आज महत्वाची बैठक; शपथविधीच्या भूमिकेवर काय निर्णय घेणार?
मविआच्या आमदारांची आज महत्वाची बैठक होमार आहे. ही बैठक अंबादास दानवे यांच्या कार्यालयात होणार असून शपथविधीच्या भूमिकेवर वर चर्चा होणार आहे.
बांगलादेशच्या ढाकामध्ये इस्कॉन केंद्राची जाळपोळ
बांगलादेशच्या ढाका जिल्ह्यातील इस्कॉनच्या केंद्रामधील मंदिराला शनिवारी पहाटे जमावाने आग लावल्याची माहिती इस्कॉन बांगलादेशने दिली. हे मंदिर आपल्या भाविकाच्या कुटुंबाचे होते असे बांगलादेशातील इस्कॉनकडून सांगण्यात आले तर इस्कॉन नामहट्टा केंद्राला लक्ष्य केल्याचे इस्कॉनच्या कोलकात्यामधील कार्यालयाने सांगितले.
महायुतीचे सरकार जनमताने नाही तर EVMच्या कृपेने-सुषमा अंधारे
भिवंडीत आगीचे सत्र सुरूच, 3 गोदामांना आग
भिवंडीत आगीचे सत्र सुरूच आहे. वळपाडा परिसरात 3 भंगारच्या गोदामांला भीषण आग लागली आहे. गोदामाच्या शेजारील नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलवण्यात आले आहे.
शरद पवार आज मारकडवाडी दौऱ्यावर
शरद पवार आज मारकडवाडी दौऱ्यावर आहेत. गावक-यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी शरद पवार मारकडवाडीला भेट देणार आहेत.
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ताफ्यात ६५ नवीन विमाने
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ताफ्यात ६५ नवीन विमाने
एअर इंडियाही घेणार ३५ नवीन विमाने
ज्येष्ठ हिंदी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांची प्रकृती खालावली
ज्येष्ठ हिंदी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांची प्रकृती खालावली आहे. घई यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी आज ब्लॉक घेण्यात आलं आहे सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत वाजेपर्यंत माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ( सीएटृसएमटी) सुटणाऱ्या आणि त्या दिशेने येणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील जलद लोकल या माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच, या लोकल 15 मिनिटे उशिराने धावतील.
सुषमा अंधारेंना पाटण कोर्टाकडून जामीन
ललित पाटील ड्रग्स प्रकरणात सुषमा अंधारे यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये शिवसेनेचे नेते शंभुराज देसाई यांच्या वरती आरोप केले होते. या आरोपामुळे आपली बदनामी झाल्याने शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारेंना नोटीस दिली होती. आज पाटण कोर्टात सुषमा अंधारे फौजदारी प्रकरणात उपस्थित राहिल्या होत्या. त्यांना पाटण कोर्टाने जामीन दिला.