Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live: बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

छगन भुजबळांनी भाजपात प्रवेश करावा - कार्यकर्त्यांची मागणी

छगन भुजबळांनी भाजपात प्रवेश करण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. नाशिकमधील संघर्ष मेळाव्यात कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

शक्तीपीठ महामार्गाविरोधात शतकऱ्यांचं आंदोलन

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सांगलीमध्ये आज सामाजिक संघटनांनी एकत्रित येत नागपूर रत्नागिरी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. अंकली येथील रत्नागिरी नागपूर महामार्गावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी सुमारे एक तास ठिय्या मारत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक सुरू

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक सुरू असून बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थिती आहे. तसेच मंत्री उदय सामंत, मंत्री चंद्रकांत पाटीलही बैठकीत उपस्थित आहेत. अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा का नाही? निर्णय होणार याकडे लक्ष आहे.

वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर हल्ला..

हिंगोली जिल्ह्यांमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी हैदोस घातला आहे, कळमनुरीच्या सोडेगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारया ट्रॅक्टरवर कार्यवाही करणाऱ्या महसुल विभागाच्या पथकातील मंडळ अधिकारी व तलाठ्यावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे,या तलाठ्याला गभिर दुखापत झाली असून आणखी दोन जण जखमी झाले आहेत,या प्रकरणी कळमनुरी पोलीसात सात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरपंच देशमुख यांच्या कुटुंबांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात

सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसाठी माजलगावकरांनी मदतीचा हात पुढे केलाय. बीडच्या माजलगाव शहरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मदत फेरी काढून मयत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबासाठी पुढाकार घेतला. छत्रपती संभाजी महाराज चौकातून मदत फेरी काढून व्यापाऱ्यांकडून मदत गोळा करण्यात आली. यात जवळपास 15 लाखांहून अधिकचा निधी जमा झाला. हा मदत निधी सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांना सुपूर्त केला जाणार आहे.

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग विरोधात नागपूर-रत्नागिरी महामार्गावर शेतकऱ्यांनी केले रस्ता रोको आंदोलन

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सांगलीमध्ये आज सामाजिक संघटनांनी एकत्रित येत नागपूर रत्नागिरी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले.अंकली येथील रत्नागिरी नागपूर महामार्गावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी सुमारे एक तास ठिय्या मारत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.त्यामुळे रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

खातेवाटप लांबणीवर पडल्याचे कारण अजितदादांची नाराजगी- सूत्र

खातेवाटप लांबणीवर पडल्याचे कारण अजितदादांची नाराजगी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे खातेवाटपावर अजूनही एकमत नाही. वित्त खातं भाजपला पाहिजे तर राष्ट्रवादीला गृहनिर्माण खातं हवं आहे. या दोन गोष्टींमुळे तिढा कायम होता अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

नाशिकमध्ये भुजबळांचा अजित पवारांवर निशाणा

नाशिकमध्ये झालेल्या संघर्ष मेळाव्यात छगन भुजबळांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी हम एक है, तो सेफ है म्हणत भुजबळ भाजपचा सूर आळवताना दिसले. याचबरोबर अजित दादांना टोला लगावला आहे. त्यामुळे भुजबळ भाजपमध्ये जाणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. याबरोबरच मंत्रिपदावरुन नाराजी, ओबीसी लढा, मराठा आरक्षण अशा अनेक विषयांवर भुजबळांनी वक्तव्यं केल्याचं पाहायला मिळालं.

गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली

गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. बोटीत 30 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या अरबी समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

भाजपच्या मुख्य प्रतोदपदी रणधीर सावरकरांची निवड

भाजपच्या मुख्य प्रतोदपदी रणधीर सावरकरांची निवड करण्यात आली आहे. विधानसभेतील मुख्य प्रतोदपदी रणधीर सावरकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. आशिष शेलारांच्या जागी रणधीर सावरकरांची निवड करण्यात आली आहे. शेलारांची मंत्रिपदी नेमणूक झाल्याने सावरकरांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

पटोलेंसोबत चर्चा झाली की खातेवाटप करू- फडणवीसांची गुगली

'नाना पटोलेंसोबत चर्चा झाली की खातेवाटप करू, खातेवाटपावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुगली टाकली आहे. खातेवाटपावर 24 तासात तोडगा निघणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नक्षलवाद रोखण्यासाठी सरकारचं नवं विधेयक

नक्षलवाद रोखण्यासाठी सरकारचं नवं विधेयक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र नक्षलवाद विरोधी विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलं आहे.

राम शिंदेंची विधान परिषद सभापतीपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता

राम शिंदेंची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधान परिषद सभापती पदासाठी बिनविरोध निवडीची शक्यता आहे. राम शिंदे यांनी विधान परिषद सभापती पदासाठी अर्ज भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी विधिमंडळ प्रतोदपदी शेखर निकम?

चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांची विधिमंडळ राष्ट्रवादीच्या प्रतोदपदी निवड निश्चित झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

अरबी समुद्रात एलिफंटाकडे जाणारी नीलकमल बोट उलटली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 3 नौदलाचे कर्मचारी असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

अमित शहा विरोधात उल्हासनगरात आंबेडकरी अनुयायी आक्रमक

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज उल्हासनगरात आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेत,यावेळी त्यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ सुभाष टेकडीच्या आंबेडकर चौकात हातात पोस्टर घेऊन निषेध नोंदविण्यात आला आहे.

बोट दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर- मुख्यमंत्री

बोट दुर्घटनेत 101 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

नागपुरात उद्या महाविकास आघाडी करणार आंदोलन

नागपुरात उद्या महाविकास आघाडी आंदोलन करणार आहे. अमित शाहांनी केलेल्या वक्तव्याविरोधात मविआ आक्रमक झाली आहे. उद्या सकाळी 10 वाजता संविधान चौकात मविआ आंदोलन करणार आहे.

शरद पवार 21 डिसेंबरला बीड दौऱ्यावर

शरद पवार 21 डिसेंबरला बीड दौऱ्यावर आहेत. शरद पवार संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.

दिल्लीत भाजपविरोधात आम आदमी पक्षाची निदर्शनं

दिल्लीत भाजपविरोधात आम आदमी पक्षाने निदर्शनं केली. अमित शाहांच्या आंबेडकरांवरील वक्तव्यावरून आम आदमी पक्षातील कार्यकर्ते आक्रमक झाले. हातात आंबेडकरांचे फलक घेत भाजपविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेसचं उद्या आंदोलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणा-यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्याचबरोबर काँग्रेस उद्या संविधान चौकातून आंदोलनाला सुरूवात करणार असल्याचंही ते म्हणाले.

'एक देश-एक निवडणुक'साठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना

'एक देश-एक निवडणुक'साठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात एकूण 31 सदस्य असतील. अनुराग ठाकुर, प्रियंका गांधी यांच्यासह महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे जेपीसीमध्ये (Joint Parliamentary Committee) आहेत. ही समिती आपले मुद्दे तज्ञ्जांसमोर ठेवतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com