सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे आवक घटल्याने कांद्याच्या दारात वाढ झाली आहे. क्विंटायला 1000 ते 3000 पर्यंत भाव असून निर्यातीचा टॅक्स वाढवल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा अडवल्याची व्यापाऱ्यांकडून माहिती मिळाली आहे.
नवनिर्वाचित मंत्री संजय शिरसाठ आज मंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी चैत्यभूमी येथे येऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील...
आदिवासी मंत्री पदाचा पदभार आज मंत्री अशोक उईके यांनी घेतला. यावेळी राज्यमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांनी देखील खात्याचा पदभार घेतला.
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी ११ वाजता नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेणार आहेत. यावेळी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार डॅाक्टर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित असणार.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृह येथे वने, कृषी, उच्च व तंत्रशिक्षण, कौशल्य विकास विभागाचा आढावा घेणार आहेत. सर्व विभागांच्या १०० दिवसांचा नियोजन आराखड्यावर फडणवीस निर्देश देणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे देवेंद्र फडणवीसांकडून १०० दिवसांचा विकास कार्यक्रम तयार करणार आहेत.
चांदी अथवा चांदीचे दागिने खरेदी-विक्री करण्यासाठी नियम बनविण्याची तयारी सरकारने चालविली आहे. आतापर्यंत केवळ सोन्याच्या खरेदीसाठीच असे नियम लागू होते. हॉल मार्किंग नियमांसंबंधीची प्रक्रियाही सरकारने सुरू केली आहे. तांत्रिक समस्यांमुळे यात अडचणी येत आहेत. यातील मुख्य समस्या चांदीवर 'एचयूआयडी' लिहिण्याची आहे. चांदीचीवरील 'एचयूआयडी' सहजपणे बुजून जाते. त्यासाठी काय तंत्रज्ञान वापरावे, यावर विचार केला जात आहे.
काँग्रेसची बेळगावात राष्ट्रीय बैठक होणार. महात्मा गांधी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष बनल्याच्या घटनेची शतकपूर्ती असूव काँग्रेसकडून 'नव सत्याग्रह बैठक' ही बैठक होणार. महात्मा गांधींच्या काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या शतकपूर्तीनिमित्त 'नव सत्याग्रह बैठक' म्हणून ही बैठक होत आहे. या बैठकीला देशभरातून सुमारे २०० कॉंग्रेस नेते उपस्थित राहतील.
भाजपच्या नेत्या आमदार चित्रा वाघ आज कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात डीसीपींची भेट घेण्यासाठी येणार आहेत. कल्याणमधील बलात्कार आणि हत्याप्रकरणात त्या पोलिसांशी संवाद साधणार आहेत.
चौथ्या मेलवर्न बॉक्सिंग डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत बॅटींग करण्याचा निर्णय. शुभमन गिल मात्र भारताच्या पेईंग 11 मधून बाहेर.
कझाकिस्तानमध्ये विमान दुर्घटना झाली आहे. अजरबैजान एअरलाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात झाला असून लँडिग करताना हे विमान कोसळलं आहे. विमानात ७०हून अधिक प्रवाशी होते. विमान अपघातात 30 प्रवाशांचा मृत्यू झाला असून मोठ्या जिवीहीतहानीची शक्यता आहे.
युगेंद्र पवार यांनी अर्ज वैयक्तिक कारणामुळे मागे घेतला. असं मोठं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केल आहे. बारामतीचा मधून पराभूत झाल्यानंतर युगेंद्र पवार यांनी मतदानाची फेर पडताळणी करण्याची मागणी केली होती. पुणे जिल्ह्यातील शरद पवारांच्या पराभूत उमेदवारांनीही एकत्रित अर्ज केला होता. मात्र यातून गेल्या आठवड्यात युगेंद्र यांनी अचानक अर्ज मागे घेतला. यावर सुळेंनी स्पष्टीकरण दिल आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाणे पोलिस आयुक्तांशी फोनवर चर्चा झाली असून कल्याणमधील घटना गंभीर, विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला अटक झाली, हा खटला जलदगती न्यायालयात चालवा. आरोपीला फाशी होईल, हे सुनिश्चित करापोलिस आयुक्तांना फडणवीसांनी आदेश दिले.