Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live: बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा

राजन साळवी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

राजन साळवी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. राजन साळवी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

रायगड, कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच

रायगड, कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. तर मुंबई शहर आणि साताऱ्यासाठी भाजप आणि शिवसेना आग्रही आहे.

परभणीत सर्वपक्षियांचा मूक मोर्चा

परभणीत सर्वपक्षियांनी मूक मोर्चा काढला आहे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मनोज जरांगेंसह इतर राजकीय नेते मोर्चात सहभागी झाले आहेत.

देशमुख हत्या प्रकरणातील ३ फरार आरोपींपैकी दोघांना अटक

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ३ फरार आरोपींपैकी दोन जणांना अटक, पुण्यातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आलं आहे. तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारच आहे.

पुण्यात मुंब्र्यातील घटनेचीच पुनरावृत्ती

पुण्यात मुंब्र्यातील घटनेचीच पुनरावृत्ती घडली आहे. एअरटेलच्या टीम लीडरने मराठी कर्मचाऱ्यांवर अरेरावी केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी एअरटेलच्या टीम लीडरला मनसे स्टाईल चोप दिला आहे.

कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि त्याच्या पत्नीला न्यायालयीन कोठडी

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कोर्टाने आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पालिकेच्या कारभारावर केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची नाराजी

पालिकेच्या कारभारावर केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची नाराजी शहरातील प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू असल्याने नाराजी व्यक्त केली. पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. शहरातील कामे आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या केल्या सूचना

कोल्हापूरच्या विशाळगडावरील व्यवहार ठप्पच

हिंसाचाराच्या सहा महिन्यानंतरही कोल्हापूरच्या विशाळगडावरील व्यवहार ठप्पच. विशाळगडावर अजूनही संचारबंदी लागू केली आहे. गडावर स्थानिकांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नाही. पर्यटक नसल्याने विशाळगडावर शांतता आहे. सर्व व्यवहार ठप्प असल्याने स्थानिकांची उपासमार होते आहे.

ज्ञानेश्वर नगर येथील 10-15 झोपड्यांना अचानक लागली आग

ज्ञानेश्वर नगर येथील 10-15 झोपड्यांना अचानक आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी हजर. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप जीवितहानी समोर आलेली नाही. आगीचे कारण अस्पष्ट असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे कार्य सुरू

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक 2 तासानंतर सुरळीत

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक 2 तासानंतर सुरळीत.. राजापूर रेल्वे स्थानकावर थांबलेली राजधानी एक्सप्रेस तासानंतर मुंबईच्या दिशेने रवाना.. निवसर ते आडवली दरम्यात ओव्हरहेड वायर तुटली होती. जवळच्या स्थानकात उभ्या करुन ठेवण्यात गाड्या आल्या होत्या. ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूकीवर झाला होता परिणाम

पुण्यातून आरोपी सापडले; त्यांना कोणी आश्रय दिला? - धनंजय देशमुख

बीड हत्या प्रकरणातील दोन फरार आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. पुण्यातून आरोपी सापडले आहेत म्हणजे त्यांना कोणी आश्रय दिला? संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी संशय व्यक्त केला आहे.

मराठी असल्यामुळे तरुणाला नोकरी नाकारली

महाराष्ट्रातच होणारी मराठी होणारी गळचेपी थांबायचं नाव घेत नाहीय... दक्षिण मुंबईतील एका तरुणाला तो मराठी असल्यामुळे नोकरी नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय… मराठी मुलं आम्हाला कामासाठी नको, मरिन लाईन्स येथील राधेश्याम ब्रदर्स या कंपनीनं असं म्हटलंय... त्यानंतर या तरुणाने हा प्रकार ठाकरे शिवसेनेच्या निदर्शनास आणून दिला... त्यानंतर उद्धवसेनेचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी अमराठी व्यापाऱ्याला जाब विचारला.

बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा

बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. न्याय मिळत नसेल तर त्या पदावर राहण्यात अर्थ नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही देता मात्र दिव्यांगना पैसे देत नसल्याचं विधान अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर बच्चू कडू यांनी केलं आहे.

मुंबईत घाटकोपर पोलिसांची मोठी कारवाई, 13 बांगलादेशींना अटक

पोलिसांनी एका दिवसात मुंबईच्या घाटकोपर पोलिसानी आज तब्बल १३ बांगलादेशी नागरिक अटक केले आहे. हे सर्व १३ आरोपी नागरिक नालासोपाऱ्याच्या अचोले विभागात अनधिकृतपणे राहत होते. गेल्या महिन्यात घाटकोपर पोलिसानी मोहम्मद अली शेख या बांगलादेशी आरोपीला गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com