संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, कृष्णा आंधळे या आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या- विद्या चव्हाण
मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांची लोकशाही मराठीसोबत बोलताना सरकारकडे मागणी केली आहे.
वाशिम आणि धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा
वाशिम आणि धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. बीड आणि परभणीतील घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला आहे.
भारताची सागरी ताकद वाढणार
भारताची सागरी ताकद वाढणार आहे. नौसेनेच्या ताफ्यात दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीचा समावेश होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 15 जानेवारीला मुंबईत लोकार्पण होणार आहे.
धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा- सुरेश धस
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा असं म्हणत सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावं सुचवंत अजितदादांची मिमिक्री केली आहे.
विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी चौकशी होणार आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेनंतर काँग्रेसचाही स्वबळाचा सूर
ठाकरेंच्या शिवसेनेनंतर काँग्रेसनंही स्वबळाचा सूर आळवला आहे. राऊतांच्या भूमिकेवर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची गरज वाटत नसल्याची पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकारी बैठकीत अभिनंदन केले.