Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live: महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता

बीडमधील वाल्मिक कराडशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज समोर...

वाल्मिक कराडशी संबंधित एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय...यात सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि इतर काही जण दिसताय...29 नोव्हेंबर 2024 चं हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचं समोर येतंय...यामध्ये एकाच फ्रेममध्ये सर्व आरोपी दिसताहेत...

राज्यात पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये धुसफूस

राज्यात पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. यावरुन खासदार निलेश लंके यांनी टीका केली आहे. हे सरकारच शापित असल्याचं लंकेंनी म्हटलंय. इतकंच नव्हे, तर महायुतीतीलच एका बड्या मंत्र्याने खासगीत बोलताना हे वक्तव्य केल्याचा दावा खासदार निलेश लंके यांनी केला आहे. तर ईव्हीएमच्या जोरावर आलेलं सरकार टिकत नसतं असा टोला लंके यांनी लगावला आहे.

सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज

शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीवरच शिक्षकाने वाईट नजर ठेवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहरातील नामवंत हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला असून, त्या शिक्षकावर सोमवारी रात्री १ वाजता तिरोडा पोलिसांनी बाललैंगिक अधिनियमान्वये अत्याचार गुन्हा दाखल केला आहे.

पंतप्रधान मोदी 5 फेब्रुवारीला कुंभमेळ्याला भेट देणार

नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारीला करणार कुंभ मेळ्यात स्नान, नरेंद्र मोदी प्रयागराजला जाणार. नरेंद्र मोदी कुंभ मेळ्यात सहभागी होणार, संगमात स्नान करुन नरेंद्र मोदी साधणार राजकीय पुण्य मिळवणार. नरेंद्र मोदींच्या कुंभ स्नानादिवशी ते स्नान करुन दिल्ली विधानसभेला मतदान कऱण्यासाठी जातील.

शिवालय येथे महाविकास आघाडीची बैठक

महाविकास आघाडीच्या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांच्या नावावर चर्चा होणार. शिवालय येथे महाविकास आघाडीची बैठक. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीची पहिली बैठक, आज विरोधी पक्षनेता कोण आणि विधिमंडळ समित्या यावर चर्चा. ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार अधिक असल्याने विरोधी पक्षनेता कोण होणार यावर चर्चा.

'एक रुपयात पिक विमा योजना महत्त्वाची'

एक रुपयात पिक विमा योजना अत्यंत महत्त्वाचे असून शासनाने ही योजना बंद करू नये..निवडणूक काळामध्ये शेतकऱ्यांना मोठमोठे आश्वासन दिली गेली,शेतकऱ्याच्या जीवावर निवडणुका लढवल्या आणि शेतकऱ्यांची महत्त्वाची योजना एक रुपयात पिक विमा ही योजना बंद करण्याचा सुरू असून हे अत्यंत चुकीचा आहे, ही योजना बंद करू नये अन्यथा रस्त्यावर उतरून याचा निषेध करू अशी प्रतिक्रिया जालन्यातील शेतकऱ्यांनी दिलीये..

परभणी जिंतूर रस्ता पूर्ण होण्याआधीच खचला

परभणी जिंतूर राज्य महामार्ग तयार होण्याआधीच खसायला सुरुवात झाली असून रस्त्यामध्ये विविध ठिकाणी भेगा पडल्याने रस्ता पोखरून परत तयार करण्याची नामुष्की कंत्राट दारावर आली आहे. दरम्यान रस्ता दुरुस्ती होत असताना वाहनधारकांची गैरसोय होत आहे.

'एक रुपयात पिक विमा योजना महत्त्वाची' जालन्यातील शेतकऱ्यांची प्रतिक्रीया

तेजस एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, कोंकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत

मुंबईहुन मडगाव कडे जाणा-या इंजिनमध्ये संगमेश्वर आणि रत्नागिरी दरम्यान बिघाड झाला आहे. रत्नागिरीहुन दुसरे इंजिन आणून तेजस रवाना होइपर्यंत उशीर झाल्याने दोन्ही कडच्या गाड्याना उशीर झाला आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये गडचिरोलीसाठी गुंतवणुकीचा सामंजस्य करार

दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीसाठीचा पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आला आहे. कल्याणी समूहाकडून गडचिरोलीमध्ये पोलाद उद्योगासाठी 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या संदर्भात कल्याणी उद्योग समूहाने महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार केला आहे.

ठाण्यात पार्किंगच्या वादातून डॉक्टर दाम्पत्याला मारहाण

ठाण्यामध्ये पार्किंगच्या वादातून वरिष्ठ डॉक्टर मोहनीश तेजवानी आणि त्यांच्या डॉक्टर सर्जन पत्नीला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीय. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये डॉक्टरावर जीवघेणा हल्ला झालाय.

Davos 2025: दावोसमधील पहिला करार, गडचिरोलीसाठी मोठं गिफ्ट! 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या जागतिक आर्थिक फोरम परिषदेत सहभागी होण्यासाठी दावोस दौऱ्यावर गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या बहुचर्चित दौऱ्यामधून राज्यात हजारो कोटींची गुंतवणूक होणार असून कालपासून अनेकांच्या गाठीभेटी घेत मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्याचा श्रीगणेशा केला आहे.

उरणमध्ये बर्ड फ्ल्यू चा शिरकाव उरण

उरण मधील चिरनेर गावात कुक्कुडपालन करणाऱ्या व्यवसायिकांच्या मागील काही दिवसापासून कोंबड्या मृत्यू झाल्याने,शासनाच्या पशू पालन अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असता काही कोंबड्यांच्या मृत्यू संशयास्पद वाटल्याने कोंबड्यांची तपासणी करण्यासाठी भोपळा आणि पुणे येथे पाठविण्यात आल्याने त्यांनी काही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाल आहे.

महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता.

महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा रखडली आहे. उद्या होणारी सुनावणी आता महिनाअखेरीस होणार.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com