Latest Marathi News
Latest Marathi News

Latest Marathi News Updates live: कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी मोठा धक्का

फक्त ट्रेलर पाहून चित्रपटाचा अंदाज बांधणं कठीण- अमोल कोल्हे 

फक्त ट्रेलर पाहून चित्रपटात नेमकं काय आहे, याचा पूर्ण अंदाज बांधणं कठीण आहे. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई साहेब या लेझीम नृत्य करताना पाहायला मिळत आहे. हे आपलं पारंपरिक नृत्य आहे आणि या चित्रपटात या नृत्याची पेरणी नेमकी कशा अर्थाने करण्यात आलीये, या मागचा उद्देश नेमका काय? हे चित्रपट पाहिल्या शिवाय लक्षात येणार नाही.

माथेरानच्या घाटामध्ये अचानकपणे गाडीला आग लागली..

माथेरान घाटात बर्निंग कारचा थरार... गाडीमध्ये प्रवासी उडी मारून बाहेर पडले आहे. त्यामुळे आग लागली असून गाडी जळून खाक झाली आहे

शक्तीपीठ महामार्गाला धाराशीवमध्ये शेतकऱ्यांचा विरोध

राज्यभरात शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही बाधित शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केलं. महामार्गाची गरज नसताना शेतकऱ्यांवर हा महामार्ग का लादला जात आहे. असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला. बाधित शेतकरी आंदोलनाला शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे.

मुंबईतील भांडुप परिसरात एका तरुणाची आत्महत्या

मुंबईतील भांडुप परिसरात एका 23 वर्षीय तरुणने देशी बंदुकीने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली आहे. आज पहाटे सकाळी सहा वाजता राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.

अहिल्यानगरमध्ये एसटी बसला आग

एसटी मधील तांत्रिक बिघाडाणे एसटीने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने आणि वाहकाने गाडीतील प्रवाशांना उतरून दिल्याने पुढील अनर्थ टाळला.. संपूर्ण एसटी बस जळून खाक... कर्जत नगरपरिषदचे अग्निशामक दल आग विजवण्यासाठी तातडीने मिरजगाव येथे रवाना..

उद्या मुंबईत मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध मोर्चा काढला जाणार

उद्या मुंबईत मराठा क्रांती मोर्चा कडून मोर्चा काढला जाणार. संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सुर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यूचा जाब विचारण्यासाठी मोर्चा, मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान पर्यंत मोर्चा काढला जाणार. सकाळी १० वाजता मोर्चा काढला जाणार.

महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यासाठी महत्वाची बातमी

महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यासाठी महत्वाची बातमी

१ एप्रिल पासून होणार टोल ची दरवाढ

पाच ते दहा रुपयांची टोल टैक्स होणार वाढ

वाढत्या वाहनांमुळे वाढला देखभालीचा खर्च…

एसटी टिकीट दरवाढ केल्याने अमरावती मधील प्रवासी नाराज...

परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसटीएची बैठक झाली.यामध्ये एसटी महामंडळाने सुमारे 14.95 टक्के भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे, त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील प्रवासी नाराज असून त्यांनी संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी- बावनकुळे

उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी आहेत. ठाकरेंमुळेच महाराष्ट्राला गद्दारीचं गालबोट लागल्याची चंद्रशेखर बावनकुळे यांनी घणाघाती टीका केली आहे.

दोन्ही शिवसेनेनंतर आता 30 तारखेला मनसेचा मुंबईत मेळावा

दोन्ही शिवसेनेनंतर आता 30 तारखेला मनसेचा मुंबईत मेळावा होणार आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

राजकारणात दगाबाजीशिवाय पर्याय नाही- बच्चू कडू

राजकारणात दगाबाजीशिवाय पर्याय नाही. पिक्चर अभी बाकी है म्हणत बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. तर केंद्रात भाजपला उद्धव ठाकरे आणि शरद पवार पाठिंबा देणार या दाव्यावर बच्चू कडू ठाम आहेत.

हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन

हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी धरणे आंदोलन करत आहेत. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. बागायती शेती महामार्गात जात असल्याने शेतकऱ्यांचा विरोध पाहायला मिळत आहे.

साताऱ्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत

साताऱ्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत

एकावर कोयत्याने वार; करंजे येथे अल्पवयीन मुलांची हाणामारी

करंजे परिसरात दुपारच्या सुमारास अल्पवयीन युवकांच्या २ टोळक्यांमध्ये हाणामारी

एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करण्यात आल्याची माहिती मिळत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टोरेस गैरव्यवहार प्रकरणी 13 ठिकाणी ईडीचे छापे

टोरेस गैरव्यवहार प्रकरणी 13 ठिकाणी ईडीचे छापे.... मुंबई, जयपूरसह 13 ठिकाणी ईडीची छापेमारी... प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधीत बँक खाती गोठवली. 21.75 कोटी रुपयांची बँक खाती गोठवली.

साताऱ्यात शिवसेनेचे शंभूराजे देसाईंनाच मिळालं पालकमंत्री पद

पर्यटन मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या स्वागतासाठी सातारकर सज्ज... सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पालकमंत्री पदाला शंभूराजे देसाई यांची निवड झाल्यानंतर सातारा मध्ये पालकमंत्री यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.

'सरकारने मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य कराव्या'

राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य कराव्या ,जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण करू नये या मागणीसाठी परभणीच्या मानवत तालुक्यातील रेणापूर येथील मराठा युवकाने पाण्याच्या टाकीवर चडून शोले स्टाईल ने आंदोलन सुरू केले आहे, दोन तासा पासून हा युवक पाण्याच्या टाकीवर चडून सरकारवर रोष व्यक्त करत आहे...मागण्या मान्य करा मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी युवक करतोय...

कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी मोठा धक्का

शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा सह संपर्क प्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांचा राजीनामा. पक्षाच्या पदासह सक्रिय सदस्यत्वचाही राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला, उत्तर रत्नागिरी ठाकरे शिवसेनेत खळबळ.

अमित शाह-प्रविण दरेकर यांच्यात मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासावर चर्चा

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह व आमदार प्रविण दरेकर यांच्यात चर्चा..मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासावर झाली चर्चा.. स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी अट शिथिल करण्याची दरेकरांची मागणी... येत्या १५ दिवसांत बैठक घेत मागणी मान्य करण्याचे अमित शाह यांचे आश्वासन.. स्वयंपुनर्विकासाला दिलेल्या निधी फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित, शहरी भागाचा त्यात समावेश करण्याची दरेकरांनी केली मागणी...

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com