Latest Marathi News Updates live: कारागृहात वाल्मिक करडाच्या दिमतीला सात हवालदार तैनात- आव्हाड

Latest Marathi News Updates live: कारागृहात वाल्मिक करडाच्या दिमतीला सात हवालदार तैनात- आव्हाड

उद्धव ठाकरे पुण्यात भाकरी फिरवणार - संजय राऊत

उद्धव ठाकरे पुण्यात भाकरी फिरवणार असल्याचे पुण्यातील बैठकीत संजय राऊत यांनी संकेत दिले आहेत. 5 माजी नगरसेवकांनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत.

शिंदेंच्या शिवसेनेत उदय होणार- संजय राऊत

शिंदेंच्या शिवसेनेत उदय होणार, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटणार असल्याचा संजय राऊत यांनी दावा केला आहे. भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागल्याची राऊत यांनी टीका केली आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद टोकाला

रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद टोकाला गेला आहे. आमची एकतरी चूक दाखवावी. चुकलं असल्यास मंत्रि‍पदाचा राजीनामा देईल असं भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना आव्हान दिलं आहे.

वाल्मिक कराडचे समर्थक पोलिस अद्याप बीडमध्येच- दमानिया

वाल्मिक कराडचे समर्थक पोलिस अद्याप बीडमध्येच आहेत. चौकशी करुन सर्वांची बीड जिल्ह्याबाहेर बदली करा अशी तृप्ती देसाई यांनी मागणी केली आहे.

एसटी तिकीट दरवाढीविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक

एसटी तिकीट दरवाढीविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाले आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करत तिकीट दरवाढीचा निषेध करण्यात आला आहे.

अंतरवाली सराटीत दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

अंतरवाली सराटीत दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. दोघांनाही अंबड येथील सरकारी रुग्णालयात हलवलं आहे. जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. जरांगेंसोबत काही मराठा आंदोलकांचंही उपोषण सुरु आहे.

देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे. बीडच्या विशेष मकोका कोर्टाने निर्णय घेतला आहे. सु

टोरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी तौसिफ रियाजला लोणावळ्यातून अटक

टोरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी तौसिफ रियाजला लोणावळ्यातून अटक करण्यात आली आहे. 3 फेब्रुवारीपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरातील एक नवा वाद समोर

त्र्यंबकेश्वर मंदिरातील एक नवा वाद समोर आला आहे. शृंगार पूजेला येणाऱ्या आराधी पुजाऱ्याला प्रवेश नाकारला. त्र्यंबकेश्वर संस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदेंनी कारभारावर आरोप

वक्फ विधेयकातील बदलांना जेपीसीची मान्यता

वक्फ विधेयकातील बदलांना जेपीसीची मान्यता मिळाली आहे. अंतिम बैठकीत सर्व 44 सुधारणांवर चर्चा करण्यात आली आहे. विरोधी सदस्यांचे प्रस्ताव समितीनं फेटाळले आहेत.

अंजली दमानिया अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल

अंजली दमानिया अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्या आहेत. बीड सरपंच हत्या प्रकरणी भेट घेत आहेत. दमानिया धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत.

अखंड हिंदूस्थानाचं पहिलं 'हिंदू संविधान' तयार

अखंड हिंदूस्थानाचं पहिलं 'हिंदू संविधान' तयार करण्यात आलं आहे. 3 फेब्रुवारीला महाकुंभात सादर करणार आहेत. शंकराचार्यांच्या संमतीनंतर केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार आहेत.

कारागृहात वाल्मिक करडाच्या दिमतीला सात हवालदार तैनात- आव्हाड

'कारागृहात वाल्मिक करडाच्या दिमतीला सात हवालदार तैनात असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत आरोप केला आहे. बीडमधील गँग स्वत:वर गुन्हा दाखल करून कोठडीत जात आहेत. वाल्मिक कराडवरून जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com