Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live: बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील तपासावर झिशान सिद्दिकींची नाराजी

अजित पवार आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार

कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार

राजीनाम्यावर मी उत्तर देणार नाही- धनंजय मुंडे

राजीनाम्यावर मी उत्तर देणार नाही. राजीनाम्यावर फडणवीस आणि अजित पवार बोलणार असल्याचं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

वाल्मिक कराड काही दिवसांनी पुन्हा राजकारणात दिसेल-राऊत

वाल्मिक कराड काही दिवसांनी पुन्हा राजकारणात दिसेल असा खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे. वाल्मिकसाठी रुग्णालयातील संपूर्ण मजला खाली केल्याचाही राऊतांनी आरोप केला आहे.

आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अॅक्शन मोडवर

आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अॅक्शन मोडवर आली आहे. मुंबईतील शिवसेनेत मोठे फेरबदल केले जाणार आहेत.

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर जैसे थे ठेवण्याचा निर्णय

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर जैसे थे ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आणखी एक वर्षासाठी पथकर 250 रुपये इतकाच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत GBSबाबत आढावा

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत GBSबाबत आढावा घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यातील GBSचा आढावा घेतला. शासकीय रुग्णालयात उपचाराची व्यवस्था करा असे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.

मंत्री धनंजय मुंडे दिल्लीत जाण्याची शक्यता

मंत्री धनंजय मुंडे दिल्लीत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्या धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीतील फुटीचा विधानसभेला मोठा फटका बसला -जयंत पाटील

राष्ट्रवादीतील फुटीचा विधानसभेला मोठा फटका बसला आहे. लोकशाहीच्या क्रॉसफायर कार्यक्रमात जयंत पाटलांनी कबुली दिली आहे. फूट पडली नसती तर 70-75 पर्यंत जागा मिळाल्या असत्या असं जयंत पाटील यांनी विधान केलं आहे.

चार्जशीटमध्ये माझं नाव नाही - मोहित कंबोज

चार्जशीटमध्ये माझं नाव नाही. 'झिशान सिद्दीकींचं स्टेटमेंट तोडून वापरलं जात असल्याचं भाजप नेते मोहित कंबोज यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मोहित कंबोज यांनी मागणी केली आहे.

हत्या प्रकरणातील तपासावर झिशान सिद्दिकींची नाराजी

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील तपासावर झिशान सिद्दिकींची नाराजी व्यक्त केली आहे. 'अनेकांची नावं घेतली मात्र कुणाचाच तपास झाला नाही. माझ्या देखील जीवाला धोका असल्याचं झिशान सिद्दिकी यांनी म्हटलं आहे. तर माझ्या जीवाचं बरं-वाईट झालं तर बिल्डरच जबाबदार असतील असं त्यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com