Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live: आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर

भाजपकडून आता दर 15 दिवसांनी मंत्र्यांची क्लास घेतली जाणार

भाजपकडून आता दर 15 दिवसांनी मंत्र्यांची क्लास घेतली जाणार आहे. सरकारमार्फत कामे करताना भाजपचा संघटना मजबुतीसाठी प्रयत्न असणार आहे.

आठवड्यातील पहिले तीन दिवस मुंबईत थांबा

आठवड्यातील पहिले तीन दिवस मुंबईत थांबा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप मंत्र्यांना आदेश दिले आहेत. गुरूवारी आणि शुक्रवारी विभागाच्या कामाचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

2 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता - सूत्र

2 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर अमित शाह यांच्याशी चर्चा करणार आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सासवड येथे आभार सभा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सासवड येथे आभार सभा होणार आहे. विजय शिवतारेंच्या विजयानंतर आज सभा घेणार आहेत. संध्याकाळी सात वाजता पालखी मैदानावर सभा होणार आहे.

जालन्यात रेल्वे ट्रॅक ओलांडताना ट्रक अडकला

जालन्यात रेल्वे ट्रॅक ओलांडताना ट्रक अडकला. त्यामुळे मुंबईकडून नांदेडकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसने इमर्जन्सी ब्रेक लावल्याने ट्रेन थांबली. एका तासानंतर रेल्वे ट्रॅकवरुन ट्रकला काढण्यात यश आलं. ट्रेन चालकाने सावधगिरी बाळगल्याने मोठी दुर्घटना होता टळली.

शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला

शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला आहे. खाणीतून बाहेर काढलेल्या गाडीत धोडींचा मृतदेह आढळला आहे. गुजरातच्या भिलाडमधील दगड खाणीत मृतदेह सापडला आहे. क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात यश आलं आहे.

आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर

आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. GDP वाढीचा दर ६.३ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com