महाविकास आघाडी (मविआ) सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्याच्या कटकारस्थानाची विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) माध्यमातून चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी मुंबई पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली आहे.
जळगावात आढळला 'गुइलेन बरे सिंड्रोम'चा पहिला रुग्ण आढळला आहे . रुग्ण आढळताच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णावर उपचार सुरू
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. या अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी GDP वाढीचा दर हा ६.३ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या बजेटकडे उद्योजक, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्यापर्यंत सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री सकाळी 11 वाजता बजेट सादर करणार आहेत.
#WATCH | Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman leaves from her residence. She will present #UnionBudget2025 at the Parliament today. pic.twitter.com/kcf4aEZz0h
— ANI (@ANI) February 1, 2025
#WATCH | Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman arrives at the Ministry of Finance. She will present #UnionBudget2025 at the Parliament today. pic.twitter.com/T59lxfo5YT
— ANI (@ANI) February 1, 2025
रत्नागिरी जिल्ह्यातील तीन माजी आमदार लवकरच शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. जिल्ह्यातील चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील माजी आमदार सुभाष बने आणि लांजा-राजापूर विधानसभाचे माजी आमदार गणपत कदम लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
#WATCH | President Droupadi Murmu feeds Union Finance Minister Nirmala Sitharaman the customary 'dahi-cheeni' (curd and sugar) ahead of her Budget presentation.
— ANI (@ANI) February 1, 2025
Union Finance Minister Nirmala Sitharaman will present her 8th consecutive #UnionBudget, today in Parliament
(Source… pic.twitter.com/jZz2dNh59O
अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात मोठी तेजी; सेन्सेक्स 950 अंकानी वधारला
बिहारमध्ये मखाणा उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विशेष मखाणा बोर्डाची स्थापना केली जाईल.
किसान क्रेडीट कार्डवरील कर्ज मर्यादेत 3 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
8 कोटींहून अधिक मुलांना पोषक आहार पुरवला जाणार
२५ हजार कोटी खर्च करून मेरिटाईम बोर्ड स्थापना, अतिविशाल जहाजांचाही योजनेत समावेश
अर्थसंकल्पात नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या टीडीएस मर्यादेत एक लाखांनी वाढ करण्यात आली आहे. तर कर न भरलेले आता 4 वर्षांपर्यंत कर भरू शकणार आहेत.
100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना
कॉटन प्रोडक्शनसाठी 5 वर्षांची मोहिम
पीएम किसान कार्डवर कर्ज मर्यादा 3 वरून 5 लाखांवर
भारतीयांची स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे.
LICच्या नावाखाली देशभरातील नागरिकांना लाखोंचा गंडा घातला आहे. पुण्यात 'फ्रॉड कॉल सेंटर'वर छापेमारी करत तिघांना अटक करण्यात आली आहे.
राजन साळवी येत्या तीन तारखेलाच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर सुभाष बने, गणपत कदम शिवसेनेच्या वाटेवर असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.