Latest Marathi News Updates live: अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक...

Latest Marathi News Updates live: अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक...

इंदापूर तालक्यात तुतारीमय वातावरण, भाऊंच्या प्रचार सभेला शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघांची उपस्थिती

आज भाऊंच्या प्रचार सभेला शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे दोन्ही येणार आहे. इंदापूर तालक्यात तुतारीमय वातावरण झालेलं आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतली असल्याने विजय पवार साहेब,तुतारी आणि भाऊंचा होणार आहे. ज्या नेत्यांना भाऊंनी पदे दिली, ते अचानक भाऊना अचानक सोडून गेलेले आहेत. यात एक षडयंत्र रचले गेलेल आहे. भाऊंना एकट पाडण्याचे काम विरोधकांनी केलेले आहे. पण आम्हाला याची चिंता नाही. सर्वसामान्य जनता आमच्या सोबत आहेत. इंदापूर तालक्यातील तुतारी वाजणार आणि विजय भाऊं चा होणारच.

शेकापच्या भूमिकेवर ठाकरेंचा संताप, जयंत पाटलांना उद्धव ठाकरेंकडून खडेबोल

कर्जतच्या सभेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेकापच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. शेकाप नेते जयंत पाटील यांना त्यांनी खडे बोल सुनावले. लढायचं तर सरळ लढूया, दोस्ती करायची तर उघड दोस्ती करूया पण असे विचित्र वागू नका, असा सल्लावजा इशारा ठाकरे यांनी शेकाप नेते जयंत पाटील यांना दिला. तुमच्या कुटुंबासाठी मी अलिबागचे ची जागा सोडली तरीही तुम्ही उरण, पेण, सांगोल्यातील उमेदवार मागे घेतले नाहीत, असं चालणार नाही असं उध्दव ठाकरे म्हणाले. तुम्ही आम्हाला कर्जत मध्ये मदत करा आम्ही तुम्हाला अलिबागमध्ये मदत करतो सगळे निवडून येतील असं आवाहन ही उद्धव ठाकरे यांनी जयंत पाटलांना केलं.

महाडमध्ये भरत गोगावलेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम दिवशी महाड शहरातून भरत गोगावले यांच्या प्रचारार्थ महायुतीने रॅलीचे आयोजन केले होते स्वतः भरत गोगावले , युवासेनेचे नेते विकास गोगावले यांनी या रॅलीमधून मतदार तसेच व्यापारी वर्गाची थेट भेट घेतली शहरातून निघालेल्या रॅलीत सर्व धर्मिय समाज बांधवांसह महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मुस्लिम समाजातील महिलांनी जोरदार घोषणा देत भरत गोगावले हेच पुन्हा आमदार पाहिजेत अशा भावना व्यक्त केल्या.

सोन्याच्या भावात 15 दिवसात मोठी घसरण

सोन्या चांदीच्या भावात गेल्या 15 दिवसापासून मोठी घसरण झाली असून गेल्या 15 दिवसात सोन्याच्या भावात 5 हजार 500 रुपये तर चांदीच्या भावात 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे भाव 75 हजार रुपये तर चांदीचे भाव 91 हजार रुपये इतके असून आंतरराष्ट्रीय घडामोडींसह राज्यातील विधानसभा निवडणुकांचाही सोन्या चांदीच्या भावावर परिणाम होत असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. तर विधानसभा निवडणुकीचा फारसा परिणाम सोन्या चांदीच्या भावावर नसल्याचे सोन्याच्या व्यापारांचे म्हणणे आहे. जळगाव सुवर्ण नगरी मधून याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी.

स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांची मोठी घोषणा…

स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अंकुश कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेमध्ये बोलताना मराठा समाजाला ५०% मधून आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. सगळेच पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मकता दर्शवतात मात्र ५०% मधून आरक्षण देण्याबाबत कोणताही नेता व राजकीय पक्ष स्पष्ट व ठोस भूमिका घेत नाही. ५०% च्या आतून आरक्षण देण्याचा विषय आला की सगळेच मूग गिळून गप्प बसतात. यावर टिप्पणी करत स्वराज्य पक्ष मराठा समाजाला ५०% मधूनच आरक्षण देईल अशी मोठी घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

जीएसटी भरणाऱ्या करदात्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा

जीएसटी भरणाऱ्या करदात्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. जीएसटी रिटर्न भरण्यासाठी जीएसटी अंमलबजावणी समितीकडून मुदतवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र व झारखंड मधील मतदानामुळे २० ऐवजी २१ नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी...

दौंड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगता सभेसाठी आले असता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून वरवंड मधील हेलिपॅडवर यांच्या हेलिकॉप्टर आणि बॅगांची तपासणी करण्यात आलीय. यावेळी देवेंद्र फडणीस यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केल्याचे पाहयला मिळाले.

बारामतीतील अजित पवारांच्या सांगता सभेला सुरुवात

बारामतीतील अजित पवारांच्या सांगता सभेला सुरुवात झाली आहे.

मतदानासाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज

मतदानासाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदान प्रक्रियेसाठी 2 हजार 278 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आलीय.

कांद्याच्या दरात मोठी वाढ

कांद्याच्या दरात मोठी वाढ झालीय. कांदा आता थेट शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. कांद्याचे दर 80 ते 100 रुपये किलोवर पोहचले आहेत. कांद्याचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांना फटका बसलाय.

महाराष्ट्रात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया २० तारखेला पार पडणार आहे.गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला प्रचार आज थांबला आहे. २३ तारखेला निकाल लागणार असून कोणाचे पारडे जड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्या प्रकरणात मोठा हात असल्याची माहिती आहे. मुंबई पोलिस परदेशातल्या आरोपीला घेऊन येणार भारतात? बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा होणार?

अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक...

अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक ,सभा आटपून परत येताना दगड फेक झाल्याची माहिती मिळाली आहे. यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. उपचारासाठी अनिल देशमुख यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com