2026 सालच्या पावसाळ्यापूर्वी मुंबईतील रस्त्यांचं काँक्रीटीकरण पूर्ण होणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची दिलीये...येणा-या पावसाळ्या पर्यंत रस्त्याचं काम करण्यासाठी वेळ मिळाला असून त्यानंतर मिळणा-या आठ महिन्यांत मुंबईतील रस्त्यांचं काँक्रीटीकरणाचं काम पूर्ण होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय...
शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरण . फरार आरोपींनी राजस्थान कडे पळून जाण्यात वापरलेली स्कार्पिओ गाडी पालघर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती...मध्यरात्रीच्या सुमारास राजस्थानच्या पाली येथून पालघर पोलिसांनी गाडी ताब्यात घेतल्याची माहिती . अशोक धोडी यांच्या हत्येनंतर फरार आरोपींनी राजस्थान कडे जाण्यासाठी स्कार्पिओ गाडीचा वापर केल्याची माहिती
कॅनडामधील गायक प्रेम ढिल्लन यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर पंजाबी मनोरंजन उद्योगात पुन्हा धोक्यात आला आहे. पंजाबी मनोरंजन उद्योगावर पुन्हा एकदा भीती आणि दहशतीचे ढग दाटून आले आहेत. सोमवारी पंजाबी गायक प्रेम ढिल्लन यांच्या कॅनडा येथील घराबाहेर गोळीबार झाल्याचा दावा अलिकडच्या वृत्तांतात करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात जीबी सिंड्रोमचा एकही रुग्ण नाहीय.परंतु नांदेडहुन पुणे आणि मुंबई येथे येजा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.त्यामुळे खबरदारी म्हणून जीबी सिंड्रोमचा फैलाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील आरोग्य येंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांनी दिली.
जळगाव शहरात पाच महिन्यांपूर्वी जोशीपेठ व बागवान मोहल्ला भागात महापालिकेच्या फंडातून केलेल्या निकृष्ट दर्जाच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. तब्बल ५५ लाखांचा निधी खर्च झालेला हा रस्ता अवघ्या पाचच महिन्यात उद्ध्वस्त झाला आहे.
शिर्डीतील दुहेरी हत्याकांड झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करण्यात आली आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकरांची माहिती दिली आहे. सकाळी 6 ते दुपारी 2 दुपारी 2 ते रात्री 10 असा बदल करण्यात आले आहेत.
साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीची आज रथसप्तमीच्या निमित्ताने विशेष अलंकारिक पूजा कऱण्अंयात आला. अंबाबाई देवीचा गाभारा हा विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला आहे.
धनंजय मुंडेच उद्या आले तर मी त्यांच स्वागत करेन, मी त्याचा राजीनामा मागत नाही मी फक्त वर्णन करतो. अजित पवार त्यांच्या मागे ठाम उभे आहेत. आम्ही राजीनामा मागून काय फायदा असं सुरेश धस म्हणाले आहे.
जामीन मिळाल्यानंतर सूरज चव्हाण यांनी 'मातोश्री'वर जाऊन आदित्य ठाकरेंची गळाभेट घेतली आहे.