Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live: मराठी भाषेला अजूनही दुय्यम स्थान, पुण्यातील बँकेच्या एटीएम मध्ये मराठी भाषेचा पर्याय नाही

शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नवे धोरण

किमान आधारभूत योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून शेतमालाच्या हमीभावाने खरेदी करताना काही राज्यस्तरीय नोडल संस्थांनी त्यांच्या अधिनस्त विविध फार्मस पोड्युसर कंपन्याना खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी पैशांची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शरद पवारांनी प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली

शरद पवार यांनी आमदार, खासदार आणि पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईमध्ये बोलवली आहे. 28 फेब्रुवारीला ही बैठक वाय बी चव्हाण सेंटरला होणार आहे. या बैठकीला शरद पवार हे स्वतः उपस्थित राहून सध्या राज्यातील राजकारणाचा आणि तसेच पक्षांतील अंतर्गत परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

पृथ्वीराज चव्हाणांवर राधाकृष्ण विखे पाटलांची खोचक टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड अनपेक्षित असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हटलं होतं. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा ते राज्याला माहिती नव्हतं. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून काँग्रेसला अधोगती सुरु झाली. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीवर वक्तव्य करणं रास्त नाही, असं विखे पाटलांनी म्हटलंय.

मराठी भाषेला अजूनही दुय्यम स्थान, पुण्यातील बँकेच्या एटीएम मध्ये मराठी भाषेचा पर्याय नाही

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला खरा मात्र अजूनही काही ठिकाणी मराठी भाषेला दुय्यम स्थान असलेलं पाहायला मिळत आहे... पुण्यातील कोथरूड भागात असलेल्या एका बँकेत मराठी भाषेचा वापर कमी असल्याचं पाहायला मिळाले तसेच या बँकेच्या एटीएम मध्ये मराठी भाषाच नसल्याचे समोर आला आहे... या विरोधात मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली असून बँक मॅनेजरला निवेदन दिले आहे. आणि मराठी भाषा वापरा अशी मागणी केली आहे... याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी...

चारकोपमध्ये धक्कादायक घटना घडली

चारकोपमध्ये धक्कादायक घटना घडली. 22 वर्षीय युवतीने गळफास घेत आत्महत्या केली चारकोप पोलीस पुढील चौकशी करत आहेत

पेमेंट केल्याची पावती मागितली म्हणून कोंडून ठेवले मुलुंडमधील घटना

मुलुंड पूर्व येथे असणाऱ्या धवलगिरी हॉटेलमध्ये बुक केलेल्या खोलीचे पेमेंट केल्यानंतर पेमेंट केल्याची पावती न देता तक्रारदार किरण पटते आणि त्यांच्यासोबत असलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) प्रमोद प्रेम यांना लॉजमध्ये कोंडून ठेवल्याची घटना समोर आलीआहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com