विधानसभेच्या उमेदवारी अर्जासाठी अखेरचे दोन दिवस

विधानसभेच्या उमेदवारी अर्जासाठी अखेरचे दोन दिवस

गणेश नाईकांकडून उमेदवारी अर्ज दाखल

गणेश नाईकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गणेश नाईकांनी ऐरोलीतून उमेदवारी अर्ज भरला असून कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन गणेश नाईकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

पृथ्वीराज चव्हाण आज उमेदवारी अर्ज भरणार

पृथ्वीराज चव्हाण आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून उमेदवारी अर्ज भरणार असून अर्ज दाखल करण्यापूर्वी कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले.

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पालघरच्या केळवे रोड स्थानकाजवळ मालगाडीच इंजिन फेल झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या वीस ते पंचवीस मिनिट उशिराने धावत आहेत.

युगेंद्र पवार आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

युगेंद्र पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बारामती मतदारसंघासाठी ते अर्ज दाखल करणार असून शरद पवारांच्या उपस्थितीत ते अर्ज भरणार आहेत.

दिवाळी सणावर पावसाचे सावट

यंदा दिवाळीत पाऊस शक्यता वर्तवण्यात आली आहे. 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

समीर भुजबळ आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

समीर भुजबळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नांदगाव विधानसभा मतारसंघासाठी ते अर्ज भरणार असून नांदगावात अर्ज भरण्यापूर्वी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींचा आज गुजरात दौरा

पंतप्रधान मोदींचा आज गुजरात दौरा असणार असून स्पेनच्या पंतप्रधानांसोबत मोदी रोड शो करणार आहेत. टाटा समूहाच्या एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करणार असून 4,900 कोटींच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येणार आहे.

झिशान सिद्दीकी आज उमेदवारी अर्ज भरणार 

झिशान सिद्दीकी आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. वांद्रे पूर्व मधून झिशान सिद्दीकी अर्ज भरणार आहेत.

दादर माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित राज ठाकरे आज भरणार उमेदवारी अर्ज

दादर माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित राज ठाकरे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ठाकरे घराण्यातील आणखी एक ठाकरे आज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सकाळी दहा वाजताच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अमित ठाकरे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

रोहित पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

रोहित पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातून अर्ज भरणार असून अर्ज दाखल केल्यानंतर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. सभेला खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित राहणार आहेत.

हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग; 8 वाहने जळून खाक

हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली असून 8 वाहने जळून खाक झाली आहेत. या आगीत एक रेस्टॉरंट पूर्णपणे जळून खाक झाले आहे. ७-८ गाड्या जळाल्या आहेत. एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

ओडिशातील 35 लाख नागरिकांना चक्रीवादळाचा फटका

ओडिशातील 35 लाख नागरिकांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारींनी माहिती दिली असून चक्रीवादळ आणि पूरग्रस्त भागांतील घरांचे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभेच्या उमेदवारी अर्जासाठी अखेरचे दोन दिवस

विधानसभेच्या उमेदवारी अर्जासाठी अखेरचे दोन दिवस उरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवारपर्यंत मुदत असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीत अजूनही जागावाटपाचा गोंधळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज उमेदवारी अर्ज भरणार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ब्रम्हपुरी मतदारसंघातून ते अर्ज दाखल करणार असून अर्ज भरताना भूपेश बघेल उपस्थित राहणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी बारामतीत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आले असून कन्हेरीत प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून ते अर्ज दाखल करणार असून अर्ज दाखल करण्याआधी जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com