कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; आमदार जयश्री जाधवांचा शिवसेनेत प्रवेश
पुणे विमानतळावरील विमानं उडवून देण्याची धमकी
पुणे विमानतळावरील विमानं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. 11 विमानं बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली असून विमान कंपनीच्या मॅनेजरला हा धमकीचा मेल आला असल्याची माहिती मिळत आहे.
एफसी रोडवरील पाच दुकानं चोरट्यांनी फोडली
एफसी रोडवरील पाच दुकानं चोरट्यांनी फोडली. कपडे, आईस्क्रीम आणि चपलांचं दुकान फोडलं असल्याची माहिती मिळत आहे. 1 लाख 25 हजारांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले असून 2 सराईत चोरट्यांनी चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे.
कोल्हापुरात शिवसेनेचा काँग्रेसला धक्का
काँग्रेस आमदार जयश्री जाधवांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल
प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
लक्ष्मीपूजनादिवशी पुणे मेट्रो संध्याकाळी 6 ते 10 बंद
लक्ष्मीपूजनादिवशी पुणे मेट्रो संध्याकाळी 6 ते 10 बंद ठेवण्यात येणार असून 1 नोव्हेंबरला पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6 ते संध्या. 6पर्यंत चालू राहमार आहे. 2 नोव्हेंबरपासून पुणे मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सुरु होईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार सागर निवासस्थानी दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार सागर निवासस्थानी दाखल झाले असून दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी अजितदादा सागर निवासस्थानी पोहचल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेसचे नेते रवी राजा यांचा राजीनामा
काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी राजीनामा दिला आहे. रवी राजा यांनी मल्लिकार्जुन खर्गेना राजीनामा पत्र पाठवलं आहे. सायन विधानसभा मतदारसंघातून ते इच्छुक होते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 425 किलो भेसळयुक्त खवा जप्त
छत्रपती संभाजीनगरमध्ये 425 किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला असून मिटमिटा परिसरातील कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे.
डोंबिवलीत फडके रोडवर 'दिवाळी पहाट' मोठ्या उत्साहात साजरी
डोंबिवलीत फडके रोडवर 'दिवाळी पहाट' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन डोंबिवलीकर फडके रोडवर दिवाळी पहाट निमित्त एकमेकांना शुभेच्छा देतात.
पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून 13 लाखांचा गांजा जप्त
पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून 13 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजा तस्करी प्रकरणी ओडिसातील तिघांना अटक करण्यात आली असून पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे.
माहीमचे शिवसेना उमेदवार सदा सरवणकरांनी रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट
माहीमचे शिवसेना उमेदवार सदा सरवणकरांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली.
स्पेनमध्ये पावसाचा हाहाकार
स्पेनमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. 4 तासांत विक्रमी 320 मिमी पावसाची नोंद झाली असून अतिवृष्टीमुळे स्पेनमध्ये 52 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
दिवाळीनिमित्त फुलांच्या दरात वाढ
दिवाळीनिमित्त फुलांच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. फुलांच्या दरात ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नागपुरातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नागपुरातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार. प्रचाराची सुरुवात राहुल गांधी नागपूरमधून करणार आहेत. राहुल गांधी 6 नोव्हेंबरला नागपुरात आयोजित संविधान सन्मान संमेलनात सहभागी होणार आहेत.
लक्ष्मीपूजनापूर्वीच सोन्याला नवी झळाळी
लक्ष्मीपूजनापूर्वीच सोन्याला नवी झळाळी. सोने 400 तर चांदी 1 हजार 300 रुपयांनी महागली. सोने प्रतितोळा 80 हजारांवर पोहोचलं आहे.
अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची महत्त्वाची बैठक
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची महत्त्वाची बैठक आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार असून विविध समाजाच्या धर्मगुरूंशी ते चर्चा करणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
राज्यातील 287 मतदारसंघातील एकूण 7 हजार 967 उमेदवारांपैकी 7 हजार 050 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर 917 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
शिर्डीच्या साई मंदिरात दिपोत्सवाचा कार्यक्रम
शिर्डीच्या साई मंदिरात दिपोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून साई मंदिर व मंदिर परिसरामध्ये हजारो दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहे.
राज्यातील विविध शहरात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन
आज नरक चतुर्दशी. पहीले अंभ्यगस्नान. आज राज्यातील विविध शहरात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.