Lokshahi News Live
Lokshahi News Live

Latest Marathi News Updates live: विरार प्रकरणावरून भाजप नेते विनोद तावडेंची राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सुप्रिया सुळेंना नोटीस

विधानसभेच्या महानिकालाचं काऊंटडाऊन सुरु; उद्या महानिकाल

विधानसभेच्या महानिकालाचं काऊंटडाऊन सुरु झालं असून उद्या निकाल समोर येणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवारांना बारामती कोर्टानं बजावलं समन्स

अजित पवारांना बारामती कोर्टानं समन्स बजावलं आहे. तर बारामतीत मतदारांना धमकावल्याप्रकरणी समन्स बजावला असून 16 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वंचित आघाडीने ट्विट करत जाहीर केली आपली भूमिका

निवडणूक निकालाआधी वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत सत्तेत असणाऱ्यांना समर्थन देण्याचं जाहीर केलं आहे. आम्ही सत्ता निवडू, आम्ही सत्तेत राहायला निवडू असं ट्विट करत वंचितने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

निकालाआधी काँग्रेसकडून विशेष खबरदारी

विधानसभा निकालाआधी काँग्रेसकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची सोय केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऐनवेळी दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून ही खबरदारी घेतली जात आहे.

राज्यभर गारठा वाढला

राज्यात गारठा वाढला. राज्यात 17 ठिकाणी तापमान 15 अंश सेल्सियसच्या खाली गेलं आहे. तर काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला

रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. रशियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला असून युक्रेनमधील निप्रो शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.

विरार प्रकरणावरून भाजप नेते विनोद तावडेंची राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सुप्रिया सुळेंना नोटीस

विरार प्रकरणावरून भाजप नेते विनोद तावडेंनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सुप्रिया सुळेंना नोटीस बजावली आहे. बिनशर्त माफी मागा, नाहीतर 100 कोटींचा दावा ठोकू असं तावडे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

वर्षा निवासस्थानी संध्याकाळी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेच्या प्रवक्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. निकालानंतर पक्षाची भूमिका मांडण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्षांची गरज पडणार नाही- गुलाबराव पाटील

'सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्षांची गरज पडणार नाही', गुलाबराव पाटील यांनी दावा केला आहे. तर सरकार स्थापनेसाठी गुलाबराव पाटलांची गरज पडणार नसल्याचा संजय राऊतांनी टोला लगावला आहे.

मविआ, महायुतीकडून बच्चू कडूंना फोन

समर्थनाच्या मागणीसाठी मविआ, महायुतीकडून बच्चू कडूंना फोन आल्याची माहिती मिळत आहे. उद्या निकालानंतर निर्णय घेणार असल्याची बच्चू कडू यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

शरद पवारांनी उमेदवारांना काय दिला कानमंत्र?

शरद पवारांनी पक्षाच्या उमेदवारांची बैठक घेतली. बैठकीत मविआला 157 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. निकाल लागेपर्यंत मतदान केंद्र न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भाजपची बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांवर करडी नजर

भाजपकडून बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे आणि निरंजन डावखरे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी आज संध्याकाळी भाजप प्रवक्त्यांची बैठक

देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी आज संध्याकाळी भाजप प्रवक्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस काय कानमंत्र देणार? याकडे लक्ष वेधलं आहे.

पुण्यात उद्या 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार

पुण्यात उद्या 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 8 मतदारसंघांची मतमोजणी कोरेगावातील धान्य गोदामात होणार असून मतमोजणीसाठी पुणे प्रशासन सज्ज झालं आहे.

समीर वानखेडे यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल

समीर वानखेडे यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून नवाब मलिक यांच्यावर दाखल असलेल्या अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेला सोपवण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी दिल्लीत बैठकांचा सिलसिला

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी दिल्लीत बैठकांचा सिलसिला पाहायला मिळतो आहे. दिल्लीत भाजप राष्ट्रीय अध्यक्षांनी बैठक बोलावली असून जे. पी. नड्डा महत्त्वांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.

सांगलीतील शाळगाव एमआयडीसीत वायू गळती

सांगलीतील शाळगाव एमआयडीसीत वायू गळती झाली आहे. वायू गळती दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू तर हॉस्पिटलमध्ये 5 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

अदानी समूहाला दुसरा मोठा धक्का

अदानी समूहाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. केनियाने विमानतळ विस्तार आणि ऊर्जा प्रकल्प रद्द केले आहेत.

इंदापुरात निकालाआधीच विजयाचे बॅनर

इंदापुरात निकालाआधीच विजयाचे बॅनर लावण्यात आले आहे. दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील यांचे बॅनर झळकले आहे.

खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या शरद कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल

खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या शरद कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही परवानगीविना आंदोलन केल्याने शरद कोळी आणि आंदोलकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियात मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी येणार

ऑस्ट्रेलियात मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी येणार असून ऑस्ट्रेलियाच्या संसदेत याबाबत विधेयक सादर

काश्मीरमध्ये हिमवृष्टी झाल्याने थंडीचा कडाका वाढला

काश्मीरमध्ये हिमवृष्टी झाल्याने थंडीचा कडाका वाढला असून बहुतांश भागातील किमान तापमानाची शून्याखाली नोंद झाली आहे.

उद्धव ठाकरेंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना फोन

उद्धव ठाकरेंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना फोन केला असून सत्ता स्थापनेचा दावा करण्याबाबत फोन केल्याची माहिती मिळत आहे.

निवडणुकीच्या घोषणेआधीच आपकडून उमेदवार जाहीर

निवडणुकीच्या घोषणेआधीच आपकडून उमेदवार जाहीर करण्यात आले असून आपकडून दिल्ली विधानसभेसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

मुंबईत उपनगरात किमान तापमानात घट

मुंबईत उपनगरात किमान तापमानात घट झाली आहे. सांताक्रूझमध्ये किमान तापमानाची 19 अंशाखाली नोंद झाली असून उत्तरेतील थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाली आहे.

पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला

पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला असून हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू, 20 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार

यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार असून 10 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

सिंधुदुर्गात निकालाआधीच निलेश राणेंचे विजयी बॅनर

सिंधुदुर्गात निकालाआधीच निलेश राणेंचे विजयी बॅनर लावण्यात आले आहे. 'नाद करा.. पण आमचा कुठं?' असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे.

पुण्यात झळकले अजित पवारांचे बॅनर

पुण्यात झळकले अजित पवारांचे बॅनर. बॅनरवर अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला असून 'विकासाचा वादा, अजितदादा', असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे.

राजकीय पक्षांची हॉटेलवारी होण्याची शक्यता

राजकीय पक्षांची हॉटेलवारी होण्याची शक्यता. निवडून येणाऱ्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी हॉटेलवारी होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल येणार

विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल येणार आहे. मतदानयंत्रांना स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात आली असून स्ट्राँग रूमवर सीसीटीव्हीने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

निवडणूक निकालाआधीच राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली

निवडणूक निकालाआधीच राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. मविआ, महायुतीकडून सत्ता स्थापनेबाबत चाचपणी सुरु असून मविआच्या कालच्या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.

महविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुन्हा बैठक

महविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुन्हा बैठक असून आज दुपारी बैठक होण्याची शक्यता आहे. मतदान केंद्रांवरील सुरक्षेचा आढावा आज पुन्हा घेतला जाणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com