Latest Marathi News Updates live: नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज आणि उद्या छत्तीसगड दौऱ्यावर
मुंबईतील वरळी भागात पूनम चेंबर इमारतीला आग
वरळीमध्ये इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
महाविकास आघाडीचा बैठकीला सुरुवात
महाविकास आघाडीचा बैठकीला सुरुवात झाली असून अंबादास दानवे यांच्या शासकिय निवासस्थानी बैठक सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूर विमानतळावर दाखल
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर आणि अभियांत्रिकी कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
उद्या राहुल गांधी महाबळेश्वरमध्ये येणार
उद्या राहुल गांधी महाबळेश्वरमध्ये येणार असून पर्यटनस्थळांना ते भेट देणार आहेत.
आज दुपारी 4 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार
आज दुपारी 4 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असून नागपूरच्या राजभवनमध्ये शपथविधी होणार आहे. संध्याकाळी 5.30 वाजता नव्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 वाजता घेणार पत्रकार परिषद
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात येणार
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात येणार असून त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
भंडाऱ्यात धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी रखडली
भंडाऱ्यात धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी रखडली असल्याचे पाहायला मिळत असून धान खरेदी रखडल्याने पुन्हा शेतकरी अडचणीत सापडला आहे. अवकाळी पाऊस आल्यास धान खराब होण्याची शक्यता आहे.
भाजप आमदारांना मंत्रिपदासाठी फोन यायला सुरुवात
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी नवा चेहरा देणार असल्याची माहिती मिळत असून कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील आणि सांगलीचे विश्वजीत कदम यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.
मराठवाड्यात थंडीचा कडाका
मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला असून बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाड्यात किमान तापमान 11 अंश सेल्सिअस आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम पार पडणार असून चहापानावर विरोधक बहिष्कार टाकणार असल्याची माहिती मिळत आहे.
जालना जिल्ह्यात थंडीचा पारा वाढला
जालना जिल्ह्यात थंडीचा पारा वाढला असून ग्रामीण भागात 10 अंश सेल्सिअस तापमान झाले आहे. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्याचे पाहायला मिळत आहे.
15 जानेवारीला पंतप्रधान मोदी नवी मुंबई दौऱ्यावर
15 जानेवारीला पंतप्रधान मोदी नवी मुंबई दौऱ्यावर येणार असून पंतप्रधान मोदी खारघरमधील इस्कॉन मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष सूर्यदास प्रभू यांनी ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात आज होणार मंत्रिमंडळ विस्तार
महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे. 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. मात्र, मंत्रिमंडळात कोणाला कोणतं खातं आणि मंत्रिपद मिळणार याबाबत तर्क लढवले जात आहेत.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा
मुंबईसह ठाणे, भिवंडीत १५ टक्के पाणीकपा करण्यात येणार असून पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आहे.
महाराष्ट्रात भाजपमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता
महाराष्ट्रात भाजपमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून बावनकुळेंना नव्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे तर गिरीश महाजनांना संघटनात्मक जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत.
आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार तर 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार
आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार तर 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली मोठी बातमी
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली मोठी बातमी समोर आली असून सुनिल तटकरेंनी नरहरी झिरवळांना फोन केला असल्याची माहिती मिळत आहे.