तमिळ अभिनेता अजित कुमारच्या रेसिंग कारला अपघात झाला असून दुबईमध्ये सरावादरम्यान ही घटना घडली असून या घटनेत अजित कुमार थोडक्यात बचावले
मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आली आहे. अरुण गवळी यांनी संचित रजा मिळवण्यासाठी 18 ऑगस्ट 2024 अर्ज केला होता
नवी मुंबईत आज 10 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.. नवी मुंबई महानगरपालिकेने मुख्य जलवाहिनी दुरुस्ती करण्याचं काम तातडीने हाती घेतलंय. या कामासाठी जलवाहिनीवरील पाणी पुरवठा रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
पुणे विमानतळ धावपट्टीच्या विस्तारासाठी लवकरच भूसंपादन करण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
फिरत्या शौचालयाप्रमाणे आता महिलांसाठी फिरते स्नानगृह, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा अनोखा उपक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 विभागाचा आढावा घेणार असून सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी 2 वाजता बैठक होणार आहे.
मुंबईत HMPV चा पहिला रुग्ण आढळला असून सहा महिन्याच्या बाळाला एचएमपीव्हीची लागण झाली आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला असून उदय सामंत यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार दिल्लीला जात असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'संघ दक्ष'. आशिष शेलार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांची गोपनीय बैठक. लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती