Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live: आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार-शरद पवार

बीड आणि परभणीतील घटनेच्या निषेधार्थ जालन्यात आज जनआक्रोष मोर्चा

बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र मस्के यांची निवड

ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल झालेले राजेंद्र मस्के यांची शरद पवार गट बीड जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पद होते. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने राजेंद्र मस्के यांची नियुक्ती केलीय.

उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची पत्रकार परिषद

मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणावर कोर्टानं ओढले ताशेरे

मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणावर कोर्टानं ताशेरे ओढले आहेत. मुंबईची दिल्ली होऊ देऊ नका, प्रदूषण तज्ज्ञांची नेमणूक करा. न्या. देवेंद्र उपाध्याय आणि गिरीष कुलकर्णी यांनी सरकारला धारेवर धरलं.

पुण्यातील 487 गृहप्रकल्पांना स्थगिती; ‘महारेरा’चा गृहप्रकल्पांना दणका

आदित्य ठाकरे आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार

नागपूरच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार

नागपूरच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार असून उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

भंडाऱ्यात सायबर क्राईम रोखण्यासाठी AI चा वापर

भंडाऱ्यात सायबर क्राईम रोखण्यासाठी AI चा वापर करण्यात येणार असून सायबर फसवणूक झालेल्या व्यक्तीला AI उत्तरं देणार आहे. व्हॉटसअॅपवर मॅसेज केल्यावर AI उत्तरं देणार आहे.

आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार-शरद पवार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देण्यात येणार.आढावा बैठकीत शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिलंय.

पुण्यातील पर्वती येथील वसाहतीमध्ये रात्री घरांवर दगडफेक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते महापालिकेच्या मच्छी मार्केट कामाचे भूमिपूजन

मंत्री नितेश राणे यांनी घेतली संभाजी भिडे यांची भेट

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com