सैफ अली खानला आज घरी सोडण्याची शक्यता असून शस्त्रक्रियेनंतर सैफची प्रकृती सुधारली असल्याची डॉक्टरांची माहिती आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात मलेरियाच्या रुग्णात वाढ झाली असून मलेरियाचे सर्वाधिक 185 रुग्ण मुंबईत तर डेंग्यूचे 44 रुग्ण मुंबईत आढळले असल्याची माहिती आहे.
आजपासून दावोस परिषदेला सुरुवात होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणते करार करणार, काय घोषणा करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कारला आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
पुण्यात मोबाईल टॉवर कंपन्यांकडे पालिकेची थकबाकी. तब्बल 3500 कोटींची थकबाकी असल्याची माहिती आहे.
३० जानेवारीला मनसेचा मुंबईत मेळावा होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
अकोल्यात आज जनआक्रोश मोर्चा असून संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे.