Latest Marathi News Updates live: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस

एसटी तिकीट दरवाढीच्या विरोधात आज ठिकठिकाणी बस स्थानकात आंदोलन

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस; पत्रकार परिषदेतून काय बोलणार?

मारकडवाडी समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आज आंदोलन

पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर आजपासून तीन दिवस पुन्हा ब्लॉक

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून तीन दिवस पुन्हा ब्लॉक असणार आहे. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर डोंगरगाव कुसगाव येथे पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी आजपासून तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 50 दिवस पूर्ण; आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार

रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर

मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकामांवर मत्स्य व बंदर विभागामार्फत मोठी कारवाई करण्यात आली असून मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर धडक कारवाई केली आहे.

महादेव मुंडे यांचे कुटुंबीय आज पोलीस उपाधीक्षकांची भेट घेणार आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज बैठक

खासदास संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर

भाजपच्या संघटन मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक

भाजपच्या संघटन मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक असून थोड्याच वेळात भाजप प्रदेश मुख्यालयात बैठक सुरु होणार आहे.

छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

टोरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोपी तौसिफ रियाजला लोणावळ्यातून अटक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कुंभमेळ्यात दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कुंभमेळ्यात दाखल झाले असून कुंभमेळ्यात ते स्नान करणार आहेत.

राज्यात 'गुलेन बॅरी सिंड्रोम'च्या रुग्णांची संख्या पोहचली 101वर

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची आज बैठक

मनसे नेते अमेय खोपकर हॉटस्टारच्या कार्यालयात दाखल

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत SIT कोठडी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com