Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live: आम्ही एकत्र बसतो याचं संजय राऊतांना दु:ख - रावसाहेब दानवे

मध्य, पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेलच्या मुख्य मार्गांवर सीएसएमटी – विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे...

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल, जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.

कुंभमेळ्यासाठी उरले फक्त 12 दिवस

अटल सेतु मॅरेथॉनसाठी 13 तास बंद राहणार

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून रविवारी, १६ फेब्रुवारीला मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग १३ तास बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई, पुण्याकडे जाण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे..

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा धक्का

सुरेश बनकर यांचा भाजपामध्ये प्रवेश,

GBS मुळे सांगलीत दोघांचा मृत्यू

गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराची लागण झालेल्या दोन रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मिरजेत मृत्यू झालेल्यात हुक्केरी येथील १४ वर्षीय मुलाचा आणि सांगोला सांगोला येथील ६० वर्षांच्या समावेश आहे.

आम्ही एकत्र बसतो याचं संजय राऊतांना दु:ख - रावसाहेब दानवे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com