Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live: छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती

किल्ले शिवनेरीवर आज शिवजयंतीचा सोहळा

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री शिवनेरीवर दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज मालवणमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज मालवणमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील राजकोट किल्लावर आज सकाळी 11 वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभारणीच्या कामाची पायाभरणी होणार आहे

नागपुरातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह

नागपुरातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह दिसून येतोय.⁠पारंपारिक वेशभूषेत अनेक तरुण आणि तरुणी पालखी सोहळ्यात सहभागी झालेत.

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अजिंक्यतारा किल्ल्यावर भव्य मशाल महोत्सव साजरा 

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अजिंक्यतारा किल्ल्यावर भव्य मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. साताऱ्यात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अजिंक्यतारा किल्ला शेकडो मशालींनी उजळून निघाला

शिवजन्मोत्सवानिमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देवगिरी किल्ल्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात दिनांक १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती निमित्ताने 'स्वराज्य सप्ताहा' चे आयोजन

धाराशिवमध्ये शिवजन्मोत्सव मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत निघणार भव्य रॅली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये शिवस्मारकावर करण्यात आला दुग्धाभिषेक

राज्याला मिळणार नवे परिवहन भवन

राज्याला नवे परिवहन भवन मिळणार असून मार्च महिन्यात परिवहन भवनाचं भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

ठाणे एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांचा तुटवडा

अमरावतीत जीबीएसचा पहिला रुग्ण

अमरावतीत जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला असून पुण्यावरून गावी आलेल्या 65 वर्षीय नागरिकाला लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात दीड महिन्यात ‘स्वाइन फ्लू’चे 52 रुग्ण

विधान भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com