Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Updates live : अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाने मागितली माफी; येरवडा पोलिस ठाण्यात सरेंडर होणार!

पुण्यातील गुन्हेगारी काही थांबेना, गेल्या 36 तासात पुण्यात घडल्या 4 भयंकर घटना

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात किरकोळ कारणावरून दांपत्यावर कोयत्याने हल्ला..

पुण्यातील आज सकाळी शास्त्रीनगर चौकात तरुणाईचा मद्यपान करून नंगानाच..

पुण्यातील कोथरूड परिसरातील एमआयटी कॉलेजजवळ रिक्षाचालक आणि तरुणामध्ये वाद, रिक्षाचालकाकडून तरुणाला मारहाण..

तर मोमीनपुरा भागामध्ये गाडी लावण्यावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी... ज्यूस सेंटरची करण्यात आली तोडफोड..

पुण्यातील या सगळ्या घटनांचे व्हिडिओज सध्या होत आहेत व्हायरल…

फेब्रुवारी व मार्च असे मिळून एकूण ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार

जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देत आदिती तटकरे यांनी लाडकी बहिण योजने संबंधी महत्त्वाची अपडेट दिली आहे. फेब्रुवारी व मार्चचे वितरण कालपासून सुरु केले आहे. फेब्रुवारी व मार्च असे मिळून एकूण ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत

मुंबईतील हॉटेल्समध्ये मराठी मेन्यू कार्डचा आग्रह

मुंबईतील हॉटेल्स, उपहारगृह मालकांनी मेन्यू कार्ड मराठीत करावं अशी शिवसेना ठाकरे गटाची मागणी करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. मुंबईतील हॉटेल्स, उपहारगृह, दुकान मालकांनी मेन्यू कार्ड देखील मराठीत करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आले.

एप्रिल महिन्यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर राहणार बंद ....

एप्रिल महिन्यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर राहणार बंद ...जतन आणि संवर्धनाच्या अंतिम टप्प्यातील कामासाठी काही दिवस दर्शन राहणार बंद...मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या तातडीच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय....मागील वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी होते तीन महिने बंद....

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सह्याद्री बाहेर आंदोलन

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री बाहेर आंदोलन सुरु. शक्ती कायद्याची मागणी करत महिलांची सह्याद्री बाहेर निदर्शन तसेच शक्ती कायद्याची अंमलबजावणी करा अशी मागणी. तसेच महिलांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

टीम इंडियासाठी खूशखबर, मॅट हेनरी अंतिम सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अंतिम सामन्याआधी टीम इंडियासाठी खूशखबर आहे. सामन्याआधीच न्यूझीलंडचा स्टार खेळाडू मॅट हेनरी हा अंतिम सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मॅट हेनरीच्या खांद्याला दुखापत झालेली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अंतिम सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण अफ्रिकेसोबतच्या उपांत्य फेरी दरम्यान मॅट हेनरीच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे आता उद्या म्हणजेच 9 मार्चला होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मॅट हेनरी खेळार की नाही हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.

जळजळगावात प्रेमविवाह केल्याच्या रागातून हल्ला गावात प्रेमविवाह केल्याच्या रागातून हल्ला

जळगाव जिल्ह्यात प्रेम विवाह केल्याच्या रागातून सख्या मामांनी भाचीवर धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यावल तालुक्यातल्या पिंप्री या गावात ही घटना घडली आहे.

'आम्हाला एक खून माफ करा'; रोहिणी खडसे यांची सरकारकडे मागणी

जागतिक महिला दिनी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सरकारकडे आगळी वेगळी मागणी केली आहे. महिलांना एक खून माफ करा अशी मागणी त्यांनी थेट देशाच्या राष्ट्रपतींकडे केलेली आहे. या संदर्भातील एक पत्र त्यांनी सोशल मीडियावर प्रसारीत केलेलं आहे.

अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाने मागितली माफी; येरवडा पोलिस ठाण्यात सरेंडर होणार!

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com