उद्धवजी आणि पेंग्विन ला
— Nitesh Rane (@NiteshNRane) January 16, 2026
जय श्री राम 🚩🚩 pic.twitter.com/HCz2aSp43y
| Party | Won | Leading | Total |
|---|
निवडणूक निकालानंतर कोल्हापूरमध्ये तुफान राडा झाला असून भाजपचे उमेदवार दिलीप पवार यांचा पराभव झाल्यानंतर दगडफेक झाल्याची घटना घडली.
नवी मुंबईत मनसेने खातं उघडले असून उमेदवार अभिजीत देसाई विजयी झाले आहेत.
मुंबई प्रभाग 212 गीता गवळी आणि मुंबई प्रभाग 7 मधून योगिता गवळी पराभूत
नागपूरमध्ये भाजपने सलग चौथ्यांदा विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी 7 वाजता नागपूरमध्ये विजयी जल्लोषात होणार सहभागी
नाशिक महानगरपालिका प्रभाग सहामध्ये राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांना धक्का बसला असून हिरामण खोसकर यांच्या कन्या इंदुमती खोसकर यांचा पराभव झाला आहे.
नाशकात भाजप नेते सुधाकर बडगुजर यांना दुसरा धक्का बसला असून पुत्र दीपक बडगुजर प्रभाग 29 मधून पराभूत झाले असून भाजप बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे मोठ्या फरकानं विजयी झाले आहेत.
नवी मुंबई नेरूळ प्रभाग - 21 , 22 , 23, 24 मध्ये भाजपचे चार ही पॅनेल आघाडीवर असून प्रभाग २४ ड भाजपचे सचिन लवटे तीन हजार लीडने पुढे आहेत.
जळगावमध्ये अपक्ष उमेदवारांनी खाते उघडले असून प्रभाग क्रमांक 1 मध्ये अपक्ष उमेदवार भारती सोनवणे विजयी झाल्या आहेत.
मुंबईत धारावीत भाजपला मोठा धक्का बसला असून वॉर्ड १८५मधून भाजपचे रवि राजा पराभूत झाले असून ठाकरे गटाचे टी एम जगदीश विजयी झाले आहेत.
समाजवादी पार्टीने मुंबईत खाते उघडले असून समाजवादी पक्षाच्या इरम सिद्दिकी वॉर्ड २०१मधून विजयी झाल्या असून शिवसेनेच्या सुप्रिया मोरे पराभूत झाल्या आहेत.
मुंबईत वॉर्ड १७३मध्ये भाजपच्या शिल्पा केळुसकर विजयी झाल्या असून शिवसेनेच्या पूजा कांबळे व ठाकरे गटाच्या प्रणिता वाघधरे पराभूत झाल्या आहेत.
नाशिक प्रभाग क्रमांक 9मध्ये भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले असून मनसेतून भाजपमध्ये गेलेले दिनकर पाटील यांच्यासह भारती धिवरे, संगीता घोटेकर, अमोल पाटील विजयी
जळगाव शिवसेनेचे उमेदवार ललित कोल्हे यांनी कारागृहातून निवडणूक लढवली असून ते विजयी झाले आहेत.
नवाब मलिक यांचा भाऊ कप्तान मलिक मुंबई प्रभाग 165मधून पराभूत
नाशिकमधील पहिला निकाल हाती आला असून शिंदेंच्या शिवसेनेने पहिले खाते उघडले आहे. प्रभाग 16 मधून शिंदेंच्या शिवसेनेचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.
थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पत्रकार परिषद होणार आहे. काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
ठाण्यात पहिला निकाल हाती आला असून प्रभाग 19मध्ये शिवसेनेचे 4 उमेदवार विजयी
पनवेल महानगरपालिकेचा पहिला निकाल हाती आला असून प्रभाग क्रमांक 4 मधील भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत.
जळगाव प्रभाग क्रमांक पाच मधील भाजपच्या उमेदवार आशा पाटील विजयी झाल्या असून उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार पूजा देशमुख पराभूत झाल्या आहेत.
कल्याण डोंबिवलीत मनसेचे उमेदवार प्रल्हाद म्हात्रे विजयी झाले आहेत.
मुंबई प्रभाग 2 मधून भाजपाच्या तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या आहेत.
जळगावमध्ये महायुती 18 जागांनी आघाडीवर असून भाजपचे 10 , शिवसेनेचे 8 , राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 असे महायुतीचे एकूण 18 उमेदवार आघाडीवर आहेत.
मुंबई महापालिकांचे निकाल हाती यायला सुरूवात झाली असून भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
नाशिकच्या प्रभाग 15मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश गिते पिछाडीवर असून भाजपचे मिलिंद भालेराव आघाडीवर आहेत
सोलापुरात प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपाचे चार उमेदवार विजयी झाले असून भाजपचे अंबिका गायकवाड, किसन जाधव, चैताली गायकवाड, दत्तात्रय नडगिरी विजयी झाले आहेत.
मुंबईत पहिला निकाल हाती आला असून काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या आहेत.
कोल्हापुरात काँग्रेसच्या विजयी उमेदवारांकडून जल्लोष करण्यात येत आहे.
जळगावमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून शिवसेनेनं खातं उघडलं आहे.
जळगावमध्ये कारागृहातून निवडणूक लढणारे शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर ललित कोल्हे तिसऱ्या फेरी अखेर पाचशे मतांनी आघाडीवर
मुंबईतील पहिला कल समोर आला असून भाजप 5 ठिकाणी आघाडीवर आहे. ठाकरे गट 2 ठिकाणी आघाडीवर असून एमआयएम, काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी 1 ठिकाणी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
मशीनमध्ये मतदान वेळ साडेपाच असताना पाच वाजून 21 मिनिटांनी मशीन बंद झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे मतमोजणी थांबवून निवडणूक निर्णय अधिकारी यावर माहिती घेत आहे.
जळगावमध्ये पहिला निकाल लागला असून प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपचे राजेंद्र घुगे पाटील विजयी झाले आहेत.
कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत.
धुळ्यात पहिल्या टप्प्यातील मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजप चार जागांवर आघाडीवर आहे.
कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत.
वसई विरारमधून मोठी बातमी समोर येत असून पहिल्या 115 जागांवर बहुजन विकास आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
पुण्यात मतमोजणीला सुरूवात झाली असून प्रशांत जगताप आघाडीवर आहेत.
मतमोजणीला सुरूवात झाली असून मुंबईच्या पहिल्या कलामध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे.
जालना महानगरपालिकेच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार असून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
महापालिका निवडणुकीचे मतदान काल पार पडलं. आज मतमोजणी होणार असून कोणाच्या बाजूने निकाल लागणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.