Latest Marathi News Updates live: शरद पवारांनी आधी लेकीचा आणि नातवांचा राजीनामा घ्यावा-गोपीचंद पडळकर
शरद पवारांनी आधी लेकीचा आणि नातवांचा राजीनामा घ्यावा-गोपीचंद पडळकर
भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरच्या मारकडवाडी गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांनी आधी लेकीचा आणि नातवांचा राजीनामा घ्यावा अस वक्तव्य केल आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गौतम अदानी सागल बंगल्यावर
बदलापूरच्या मांजर्ली परिसरात सिलिंडरचा स्फोट
बदलापूरच्या मांजर्ली परिसरातील एका बंद असलेल्या स्नॅक्सच्या हातगाडी वरील सिलेंडरचा स्फोट झालाय. हा स्फोट एवढा भीषण होता की त्यामुळे आजूबाजूच्या इमारतीतील घरांच्या काचा फुटल्या, तसेच इमारतीचा वॉचमन जखमी झाला आहे.
महाबळेश्वरमध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांना सावध राहण्याचा वनविभागाचा इशारा
महाबळेश्वर, दि. १०: महाबळेश्वर हद्दीतील आंबेनळी घाट, नाकिंदा गाव, हिरडा नाका परिसर आणि फळणे बस्ती रस्त्यावर बिबट्याचा वावर दिसून आला आहे. काही दिवसांपूर्वी आंबेनळी घाट मार्गे जात असताना एका बिबट्याला रस्त्यावर आढळले. यावेळी, स्थानिकांच्या लक्षात आले की बिबट्याचा मुक्त संचार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
जालन्याच्या मंठा शहरात सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक
जालन्यातील मंठा शहर बंदची हाक देण्यात आलीय, बांगलादेश मध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज मंठा शहर कडकडीत बंद पाळण्यात येत असून,या बंदला व्यापारी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. यावेळी मंठा शहरात सकल हिंदू समाजाकडून निषेध रॅली काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Kurla Bus Accident;
काँग्रेसच्या आक्षेपाचा अर्थ नाही. आम्ही ममतांना पाठिंबा देऊ- लालू यादव
केंद्र सरकार हिंदूंच्या बाबतीत ढोंग करतंय, यांना हिंदू फक्त मतांसाठी हवाय- संजय राऊत
उद्धव ठाकरे गटाचे खासदास संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर बेस्ट प्रशासनाकडून आजच्या वेळापत्रकात बदल
कालच्या कुर्ला एलबीएस रोड येथील बेस्ट बस अपघातानंतर बेस्ट प्रशासनाने आजच्या दिनक्रमात फेरबदल करण्यात आलं आहे. कुर्ला एलबीएस रोड येथील बुद्ध काॅलनी येथे अपघात झाल्याने पोलीसांनी कुर्ला रेल्वे स्थानक येथील बस आगार बंद केले आहे.
बीड/परळी: बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात परळी बंदची हाक
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात बीडच्या परळीत आज बंदची हाक देण्यात आलीय. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिलाय. बांगलादेशात हिंदूधर्मीयांवर अत्याचार होत असून याचे पडसाद सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान आज या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरिता परळी शहर कडकडीत बंद पुकारण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात निषेध नोंदविण्यासाठी परळीकर उपस्थित राहणार आहेत. तर व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आजचा बंद पाळला आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री एसएम कृष्णा यांचे निधन
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री एसएम कृष्णा यांचे मंगळवारी पहाटे २.४५ वाजता त्यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. 12 डिसेंबर 2004 - 5 मार्च 2008 या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणूनही काम बघितले
कुर्ला बेस्ट बस अपघातातील बस चालक संजय मोरे यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल
शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता- सूत्र
शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची सूत्रांची माहिती आहे. रमेश बोरनारे हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. शिवसेनेच्या मुख्य प्रतोद पदी नियुक्ती झाल्यानंतर रमेश बोरनारे आता मंत्रीपदाच्या चर्चेत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
प्रशासकीय कारणास्तव जिल्ह्यातील १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या बदलांचा आदेश काढलाय. शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संतोष डोके यांची बदली झाली तर शहर वाहतूक शाखेच्या निरीक्षक पदी पुन्हा नंदकुमार मो
दिल्ली विधानसभेसाठी AAPची दुसरी उमेदवारी यादी जाहीर
दिल्ली विधानसभेसाठी AAPची दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. दुसरी यादी जाहीर होताच मनीष सिसोदीया आणि अवध ओझांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. मी कोणत्याही मतदारसंघातून लढू शकतो अशी प्रतिक्रिया सिसोदीयांनी दिली आहे.
धाराशिवमध्ये बांगलादेश मधील हिंदूवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात सकल हिंदू समाजाची न्याय यात्रा
बांगलादेश मधील हिंदूवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात सकल हिंदू समाजाकडून धाराशिव आणि कळंब शहरात आज न्याय यात्रा काढण्यात येणार आहे. कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तर धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबईतील हवा प्रदूषणात मोठी वाढ
मुंबईच्या हवेत नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) या वायूचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे, त्यामुळे मुंबईची हवा जास्त प्रदूषित झाली आहे असा निष्कर्ष ग्रीनपीस या संस्थेने एका अहवालात व्यक्त केला आहे.
मविआच्या पराभूत उमेदवारांची दिल्लीत बैठक
पुणे जिल्ह्यातील मविआच्या पराभूत उमेदवारांची आज बैठक, शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी सकाळी होणार बैठक, वकील अभिषेक मनुसिंघवीही बैठकीला उपस्थित राहणार, प्रशांत जगताप, रवींद्र धंगेकर, रमेश थोरात, रमेश बागवे, सचिन दोडके, अश्विनी कदम बैठकीला उपस्थित राहणार