Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : अहिल्यानगरच्या शेवगाव नगरपरिषदेत माया मुंडे विजयी

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : अहिल्यानगरच्या शेवगाव नगरपरिषदेत माया मुंडे विजयी

शिवसेना निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत

अहिल्यानगरच्या शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माया मुंडे नगर अध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. माया मुंडे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांचा सोमवारी नागपुरातील भाजपच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांशी संवाद साधणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नागपूर जिल्ह्यातील भाजपच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांशी संवाद साधणार. उद्या दुपारी एक वाजता रामगिरीवर मुख्यमंत्र्यांकडून सर्व नगराध्यक्ष, नगरसेवकांना निमंत्रण

जेजुरी नगरपरिषद निवडणुकीच्या निकाल दुर्दैवी घटना विजय साजरा करताना भंडारा उधळताना अचानक आगीचा भडका उडाला 

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज दोन मेळाव्याचे आयोजन.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज दोन मेळाव्याचे आयोजन. गिरगावात निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा तर विक्रोळी विधानसभेत आमदार सुनील राऊत यांच्या कडून निर्धार मेळाव्याचे आयोजन. या दोन्ही मेळाव्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे. गिरगाव येथील मेळावा मराठी साहित्य संघ येथे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्यमार्फत आयोजित करण्यात आला आहे.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद

कामठीमध्ये 30-35 वर्षांनंतर भाजपचा नगराध्यक्ष-फडणवीस

महायुतीचाच विजय होणार हे विरोधकांना कळून चुकलं होतं-फडणवीस

महाराष्ट्राचा नंबर 1 पक्ष हा भाजपच, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

2014 च्या निवडणुकीनंतर भाजपनं शहरासह ग्रामीण भागातही विजय

सगळ्या मंत्र्यांनी निवडणुकीतील जबाबदारी पार पाडली-फडणवीस

राज्यात 75 टक्के महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आले-फडणवीस

राज्यात 3 हजारपेक्षा जास्त नगरसेवक भाजपचे फडणवीस

इतिहासात पहिल्यांदाच असा विजय झाला-फडणवीस

कोणावरही टीका न करता निवडणूक जिंकलो-फडणवीस

स्थानिक निवडणुकीत मी फक्त सकारात्मक प्रचार केला-फडणवीस

सर्वांच्या मेहनतीमुळे अभूतपूर्व यश मिळालं-फडणवीस

शिंदेंसह मी अजित पवारांचंही अभिनंदन करतो-फडणवीस

निवडणुकीत भाजपचं नंबर एकचा पक्ष राहिला-फडणवीस

'राज्याच्या जनतेनं भाजप आणि महायुतीला मोठ्या मतानं विजयी केलं'

महाराष्ट्राच्या जनतेचं मी आभार मानतो-फडणवीस

राज्यात 75 टक्के महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आले-फडणवीस

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : थोड्याच वेळात फडणवीसांची पत्रकार परिषद

मुख्यमंत्री नागपूरच्या रामगिरी निवासस्थानी बोलणार

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : कोल्हापुरात भाजपचे सुनील काणेकर नगराध्यक्ष पदावर विजयी...

कोल्हापुरच्या चंदगड नगरपंचायत निवडणुकीत भाजप पक्षाचे नगराध्यक्ष पदासह 8 नगरसेवक उमेदवार विजयी...भाजपचे सुनील काणेकर नगराध्यक्ष पदावर विजयी...

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच वर्चस्व.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच वर्चस्व...जिल्ह्यातील 9 नगरपरिषदांवर राष्ट्रवादीचा झेंडा….बारामती हॉस्टेल बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष....

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : मुक्ताईनगर परिषदमध्ये भाजपचा पराभव

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून विजय साजरा करण्यात आला.

निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून विजय साजरा करण्यात आला.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :  सांगलीच्या विटा नगरपरिषदेवर अखेर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला

सांगलीच्या विटा नगरपरिषदेवर अखेर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला आहे.विटा नगरपरिषदेत सत्तांतर घडवत माजी आमदार व भाजपाचे नेते सदाशिव पाटील यांच्या 55 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत शिवसेना शिंदे गटाने निर्विवाद सत्ता मिळवली आहे.नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देखील शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली असून काजल म्हेत्रे यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.तर नगरसेवक पदाच्या निवडणूकीत 26 पैकी 22 जागांवर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवलाय

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : नांदेडमध्ये मतदारांनी घराणेशाहीला नाकारलं..

नांदेडमध्ये मतदारांनी घराणेशाहीला नाकारलं... एकाच घरातील 6 भाजप उमेदवारांचा पराभव...नगराध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय....

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : संभाजीनगरच्या पैठण मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोषाच्या नावाखाली कार्यकर्त्यांकडून नियमांची पायमल्ली...

पैठण मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोषाच्या नावाखाली कार्यकर्त्यांकडून नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. विनापरवानगी दोन-दोन डीजेवर जल्लोष झाला. मतमोजणी केंद्राच्या बाहेरच लावले डीजे नियम मोडले. दरम्यान पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : कागलमध्ये नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे यांना कार्यकर्त्यांनी गुलाल लावला

कागल मध्ये नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे यांना कार्यकर्त्यांनी गुलाल लावला ... तसंच समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ हे दोघे प्रेमानं एकत्र येत विजयाची (victory) खून देखील केली

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: छत्रपती संभाजी नगरातील वैजापूर मध्ये भाजपाचे उमेदवार विजयी

छत्रपती संभाजी नगरातील वैजापूर मध्ये भाजपाचे उमेदवार विजयी झाल्यानंतर डीजे लावून भव्य असा जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपची झेंडे आणि डीजे वर चढून यावेळी कार्यकर्त्यांनी पदाधिकारी नाचताना पाहायला मिळाले

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: भाजपा नेते योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर यांचा प्रभाग क्रमांक 15 मधून विजय

भाजपा नेते योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर यांचा प्रभाग क्रमांक 15 मधून विजय झाल्या आहेत. 15 व्या फेरी अखेर भाजपाच्या डॉ. ज्योती घुंबरे 9273 ने आघाडीवर

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : श्रीवर्धन मध्ये शिंदेंच्या सेनेची उबाठा सेनेला मदत....

मंत्री भरत गोगावले यांनी केला खुलासा केला. सुनील तटकरेंना रोखण्यासाठी गोगावलेंची खेळी. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत उबाठा चे अतुल चोगले विजयी. विजया नंतर मंत्री भरत गोगावले गेले भेटीला. शिंदे सेनेने सर्वोतोपरी सहकार्य केल्याची भरत गोगावले यांची कबुली

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : नांदेडच्या लोह येथे एकाच परिवारातील ६ उमेदवारांचा पराभव

नांदेडच्या लोह येथे एकाच परिवारातील ६ उमेदवारांचा पराभव झाला. लोहा येथे मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली होती तरीसुद्धा त्याठिकाणी भाजपाला पराभव पत्करावा लागला. याच ठिकाणी एका सूर्यवंशी परिवारात ६ उमेदवारांना भाजपने तिकीट दिले होते.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : रायगड श्रीवर्धनमध्ये सुनील तटकरेंना मोठा धक्का

रायगड श्रीवर्धनमध्ये सुनील तटकरेंना मोठा धक्का मिळाला आहे. बालेकिल्ल्यात आदिती तटकरे यांच्या उमेदवाराचा पराभव करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अतुल चोगले विजयी

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : बारामतीत पक्षांतर्गत नाराजीचा अजित पवारांना फटका..

बारामतीत अजित पवारांना मोठा धक्का आतापर्यंत 6 विरोधी उमेदवार निवडून आले.. पक्षांतर्गत नाराजीचा अजित पवारांना फटका बसला आहे.. यापैकी 4 अपक्ष, 1 शरद पवार गट तर 1 बसपाचा उमेदवार निवडून आला आहे..यात अपक्षमधून यशपाल पोटे, वनिता सातकर, मनिषा बनकर, निलेश इंगुले निवडून आलेत.. शरद पवार गटातून आरती शेंडगे, तर बहुजन समाज पार्टीतून संघमित्रा चौधरी निवडून आली आहे..

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : श्रीवर्धनमध्ये अतुल चौगुले ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विजयी झाले, थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : मोहोळ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या 22 वर्षाच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी

मोहोळ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या 22 वर्षाच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : अहिल्यानगर दक्षिण भागातील मतमोजणी पूर्ण

अहिल्यानगर दक्षिण भागातील मतमोजणी पूर्ण झाली असून पाथर्डीत नगराध्यक्षपदी भाजपचे अभय आव्हाड विजयी झाले आहेत.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : शिरूर नगरपरिषदेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय

शिरूर नगरपरिषदेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला असून ऐश्वर्या अभिजीत पाचारणे यांचा विजय झाला आहे.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : अक्कलकोटमध्ये 3 पैकी 2 नगरपालिकेत भाजपची सत्ता

अक्कलकोटमध्ये 3 पैकी 2 नगरपालिकेत भाजपची सत्ता आली असून विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : नागपुरात नितीन गडकरींच्या घरी मुख्यमंत्री फडणवीस दाखल

नागपुरमध्ये नितीन गडकरी यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : अकोल्याच्या हिवरखेडमध्ये भाजपचा विजय

अकोल्याच्या हिवरखेडमध्ये भाजपाचा विजय झाला असून भाजपच्या सुलभा दुतोंडे यांचा विजय झाला आहे.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :  कन्नड प्रभाग तीन मध्ये नगरसेवक पदासाठी दोन उमेदवारांना समान मत; चिट्ठी काढून विजयी ठरवणार

कन्नड प्रभाग तीन मध्ये नगरसेवक पदासाठी दोन उमेदवारांना समान मत पडल्याने चिट्ठी काढून विजयी ठरवण्यात येणार आहे. चिठ्ठी काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :  बीड जिल्ह्यात काँग्रेसचे पहिले खाते उघडले

बीड जिल्ह्यात काँग्रेसचे पहिले खाते उघडले असून बीडच्या परळी नगर परिषदेत काँग्रेस पक्षाचा एक नगरसेवक विजयी झाला आहे.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ उमेदवार विजयी

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ उमेदवार विजयी झाले असून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : सिल्लोडमधून शिवसेनेचे समीर सत्तार विजयी

सिल्लोडमधून शिवसेनेचे समीर सत्तार विजयी झाले असून समीर सत्तार हे माजी मंत्री तथा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव आहेत.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : साताऱ्यात भाजपची मोठी आघाडी

सातारा जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाने मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली. सातारा, मेढा, म्हसवड, वाई, रहिमतपूरमध्ये आघाडी घेतली आहे.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व एकनाथ खडसे यांना मोठा धक्का

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजना पाटील 2561 मतांनी विजयी झाल्या आहेत.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : कणकवलीत नितेश राणेंना मोठा धक्का; संदेश पारकर विजयी

कणकवलीत नितेश राणेंना मोठा धक्का बसला असून संदेश पारकर विजयी झाले आहेत. 145 मतांनी संदेश पारकर विजयी झाले आहेत.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : बारामती नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पहिल्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत

बारामती नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पहिल्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये अविनाश हनुमंत निकाळजे, मनीषा समीर चव्हाण, जय नानासाहेब पाटील, प्रवीण दत्तू माने, रूपाली नवनाथ मलगुंडे, संपदा सुमित चौधरी व विष्णू तुळशीराम चौधरी हे विजयी झाले आहेत.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : परळी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का

परळी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. परळीत दीपक देशमुख यांचा पराभव झाला असून शिवसेना शिंदे गटाचे व्यंकटेश शिंदे यांचा विजय झाला आहे

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जल्लोष

सांगलीच्या ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे ईश्वरपूरमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या ठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :  जेजुरी नगरपरिषद मतमोजणी निकाल राष्ट्रवादीचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी

जेजुरी नगरपरिषद मतमोजणी निकाल समोर आला असून राष्ट्रवादीचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी झाले आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी झाले आहेत.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :  अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषदेत भाजपला मोठा धक्का

अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषदेत भाजपला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार शेख अब्दुल शेख हैदर विजयी झाले आहेत.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : पाचोरा नगरपरिषदेत भाजपला मोठा धक्का

पाचोरा नगरपरिषदेत भाजपला मोठा धक्का बसला असून शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :  संगमनेर सेवा समिती आघाडीवर डॉ. मैथली सत्यजित तांबे आघाडीवर

आमदार सत्यजित तांबे यांच्या संमनेर निवासस्थानाबाहेर समर्थक तसेच निवडून आलेल्या विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळपट्टी करत एकच जल्लोष केलेला आहे. संगमनेर सेवा समितीचे बहुसंख्य उमेदवार विजय होत असुन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ मैथली तांबे आघाडीवर आहे.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :  सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिके मधील सातारा, म्हसवड, मलकापूर, फलटण या पाच ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर

सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिके मधील सातारा, म्हसवड, मलकापूर, फलटण या पाच ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर असून भाजपचे मेढा नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपाली वारागडे विजयी झाल्या आहेत.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : जामनेरमध्ये भाजपाकडून जल्लोष गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

जामनेरमध्ये भाजपाकडून जल्लोष करण्यात येत असून गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. ट्रक भरून गुलाल उधळत जल्लोष करण्यात आला.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :  रायगड श्रीवर्धनमध्ये सुनील तटकरेंना मोठा धक्का, बालेकिल्ल्यात आदिती तटकरे यांच्या उमेदवाराचा पराभव

बालेकिल्ल्यात आदिती तटकरे यांच्या उमेदवाराचा पराभव

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अतुल चोगले विजयी

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :  गंगाखेडमध्ये उर्मिला केंद्रे आघाडीवर

गंगाखेडमध्ये उर्मिला केंद्रे आघाडीवर आहेत. उर्मिला केंद्रे या धनंजय मुंडे यांच्या भगिनी असून धनंजय मुंडे स्वत: बहिणीसाठी मैदानात दाखल झाले होते. गंगाखेडमध्ये प्रचार करताना धनंजय मुंडे दिसले होते.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : यवतमाळमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रियदर्शनी अशोक उईके आघाडीवर

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : नाशिक नांदगावमध्ये पहिल्या फेरी अखेर शिवसेना ( शिंदे गट ) आघाडीवर..

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : बेसा पिंपळा नगरपंचायत भाजप नगरसेवक उमेदवार मुकेश काळे विजयी

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : कणकवलीत शहर विकास आघाडीचे संदेश पारकर 3 मतांनी आघाडीवर 

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :  भगुरमध्ये राष्ट्रवादीचे सातही उमेदवार विजयी

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :  पेठवडगाव नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विद्या पोळ (यादव आघाडी) आघाडीवर

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : शिरोळ नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिव शाहू यादव पॅनलच्या योगिता कांबळे आघाडीवर.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :  चंदगड नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपचे सुनिल काणेकर आघाडीवर

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : गडहिंग्लज नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश महादेव तुरबतमठ राष्ट्रवादी अजित पवार गट आघाडीवर

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :  कागल नगरपरिषद - नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता भैय्या माने (एनसीपी अजित पवार गट +छत्रपती शाहू आघाडी) आघाडीवर.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : पुणे चाकण नगरपरिषद निवडणूकीत शिवसेना शिंदे पक्षाच्या मनिषा गोरे आघाडीवर..

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : अमरावतीच्या मोर्शी नगरपरिषद मध्ये मतमोजणीला उशिरा सुरुवात

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : नांदेड मुदखेड नगर परिषद

प्रभाग क्रमांक 1.मधून दोन भाजप उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 2 मधून दोन्ही काँग्रेसचे उमेदवार विजयी

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :   धामणगाव रेल्वे मध्ये भाजपचे सहा उमेदवार विजयी

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :  कागल-   पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस शाहू आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता माने १३८७ मतांनी आघाडीवर

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :  साताराचा अपक्षाने खाते खोललं

पहिलाच निकाल धक्कादायक

प्रभाग क्रमांक 3

मयूर कांबळे आणि जयश्री जाधव विजयी

भारतीय जनता पार्टीला दणका

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :   हातकणंगले नगरपंचायत काँग्रेसचे जिल्ह्यात तीन उमेदवार विजयी नेहाल सनदी, विजयी गिरीश इंगवले, काँग्रेस अमर वरूटे, काँग्रेस

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :  

सिन्नरमध्ये ठाकरेंची शिवसेना आघाडीवर, तर कोल्हापुरात शिंदेंची शिवसेना आघाडीवर आहे. मालवणमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर, बारामतीत अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे. तसेच, कणकवली - शहर विकास आघाडी आघाडीवर आहेत. 

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE :   अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजुनाघाट नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार सुवर्णा वरखेडे आघाडीवर

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : कराड नगरपालिकेच्या मतमोजणीला अद्याप सुरुवात नाही   प्रशासनाकडून गोंधळाची परिस्थिती

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: पालघर नगरपरिषद निवडणूकित शिवसेनेचे उत्तम घरत आघाडीवर

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: बार्शीत भाजप नगराध्यक्ष उमेदवार आघाडीवर

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE:  जालना भोकरदनमध्ये पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: बीड जिल्हात भाजपा आघाडीवर

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE:  सिन्नर मध्ये ठाकरे गटाचे उमेदवार प्रमोद चौथवे आघाडीवर

सिन्नर मध्ये ठाकरे गटाचे उमेदवार प्रमोद चौथवे आघाडीवर आहेत.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE:  बीड जिल्ह्यातून पहिला निकाल हाती 

बीड जिल्ह्यातून पहिला निकाल हाती आला असून माजलगाव येथील प्रभाग क्रमांक एक मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगर सेवक पदाचे उमेदवार अमोल सरवदे विजयी झाले आहे.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE:  भगूर नगरपरिषद - पहिल्या फेरी दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे आघाडीवर

पहिल्या फेरी दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE:  पोस्टल मतमोजणीला सुरूवात..

नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या निकालाकडे राज्याचे लक्ष असून निकालाची प्रत्येक अपडेट आपल्याला येथे बघायला मिळेल.

Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE:  बारामती नगरपरिषदेसाठी आज मतमोजणी

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसह शहरात जागोजागी पोलिसांचा चोक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. शहरातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी मध्ये ही मतमोजणी पार पाडणार आहे.

गडचिरोलीत 362 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला

गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज या तीन नगर परिषदांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. तीनही नगर परिषदांचे मिळून नगराध्यक्षपदाची 23 उमेदवार, तर नगरसेवकपदासाठी 339 उमेदवार मिळून एकूण 362 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला या निकालात होणार आहे. दरम्यान मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मतमोजणी केंद्राला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.

सकाळी दहा वाजता मतमोजणीला होणार सुरूवात

15636 एवढं मतदान या ठिकाणी झालेला आहे. 59 उमेदवार हे या ठिकाणी रिंगणात होते त्यांचे भवितव्य आज उघडणार. खडसे वर्सेस आमदार चंद्रकांत पाटील अशी लढत या ठिकाणी चुरशीची झाली. एकनाथ खडसे, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे. आमदार चंद्रकांत पाटील यांची या ठिकाणी प्रतिष्ठापनाला आहे

धुरंधर' कोण...?१० पालिका, एका नगरपंचायतचा आज फैसला

तब्बल १८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दहा नगरपरिषदा व भिसी नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज होणार असून, त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दहा नगरपरिषदांमध्ये ९४, तर भिसीत चार अशा एकूण ९९ टेबलांवर मतमोजणी होईल. नियुक्त अधिकारी व कर्मचारी साहित्यासह केंद्रात दाखल झाले. 'धुरंधर' कोण? याकडे नागरिकांसह सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. बल्लारपूर, वरोरा, मूल, भद्रावती, राजुरा, ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर, घुग्घुस नगरपरिषद व भिसी नगरपंचायतची २ डिसेंबर २०२५ रोजी निवडणूक झाली.

राज्यात नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी, निकालाचा काऊंटडाऊन सुरु...!

नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 02 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. तर शनिवारी 23 ठिकाणी उर्वरित मतदान पार पडले.

कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध सर्व राजकीय पक्ष एकत्र; कोण गुलाल उधळणार?

(Sindhudurg) नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 02 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. तर शनिवारी 23 ठिकाणी उर्वरित मतदान पार पडले.

'लोकशाही मराठी'च्या सर्वेनुसार नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचंच वर्चस्व....भाजप क्रमांक 1 चा पक्ष ठरणार तर शिवसेना दुसऱ्या स्थानावर आणि राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानावर राहण्याचा अंदाज

आज राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींची मतमोजणी

2 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी मतदान झाले. शनिवारी 23 ठिकाणी मतदान पार पडले. आज सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता आज कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सर्वपक्षीय बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.महायुतीतील तीनही पक्ष बाजी मारणार की विरोधी महाविकास आघाडीला कौल मिळणार याकडे लक्ष असेल.

निकालाचे काउंटडाउन सुरू... उत्सुकता शिगेला; मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात

निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 02 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. शनिवारी 23 ठिकाणी मतदान पार पडत आहे. आज सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता आजकोणता पक्ष बाजी याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आज 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींची मतमोजणी आज सकाळी 10 वाजता सुरु होईल

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com