महाराष्ट्र
मोठी बातमी : शाहरुखने आर्थर रोड तुरुगांत जाऊन घेतली आर्यनची भेट
सध्या बहुचर्चित असलेल्या आर्यन खान प्रकरणात आता एक नवीन माहिती समोर येत आहे. किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खान त्याला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात दाखल झाला आहे.
तब्बल तीन आठवड्यांनंतर वडील शाहरुख खान आपल्या मुलाला, आर्यन खानला भेटला आहे. काल एनडीपीएसच्या (NDPS) विशेष न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आर्यनला आता आणखी किती दिवस तुरुंगात काढावे लागणार हे पाहायचे आहे. शाहरुखला आर्यनला दहा मिनिटांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली होती.
आर्यनच्या जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.