भाजपा वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

भाजपा वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Published by :

बालाजी सुर्वासे | उस्मानाबाद | भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर विविध विषय घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने नांदेड, मालेगाव, अमरावती येथे झालेल्या हिसंक घटनेच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

सक्तीच्या विज तोडणी विरोधात आणि शेतकऱ्यांना विमा नाकारणाऱ्या कंपनी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तसेच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर कपात केली आहे. मात्र अद्यापही राज्य सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर कपात केली नाही. त्यामुळे राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले, यादरम्यान आंदोलन नंतर जिल्हाधकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com