दिनविशेष 01 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 01 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

जून महिना सुरू झाला आहे, तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 01 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 31 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: आशिया कप - भारतीय पुरुष हॉकी संघाने २०२२ आशिया कप स्पर्धेत जपानवर 1-0 असा विजय मिळवून कांस्यपदक जिंकले.

२०११: स्पेस शटल एंडेव्हर - ने २५ फ्लाइट्सनंतर अंतिम लँडिंग केले.

२००९: जनरल मोटर्स - कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. अमेरिकेच्या इतिहासातील ही चौथी मोठी दिवाळखोरी आहे.

२००४: टेरी निकोल्स - यांना ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोटाचा सह-षड्यंत्रकर्ता म्हणून जमिनीच्या शक्यतेशिवाय सलग१६१ जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, ह्या शिक्षेने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.

२००४: रमेशचंद्र लाहोटी - यांनी भारताचे ३५वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे हाती घेतली.

२००३: थ्री गॉर्जेस धरण, चीन - धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.

२००१: नेपाळी राजेशाही हत्याकांड - युवराज दीपेंद्र यांनी नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची निर्घृण हत्या केली.

१९९६: एच. डी. देवेगौडा - यांनी भारताचे ११वे पंतप्रधान सूत्रे हाती घेतली.

१९८८: युरोपियन सेंट्रल बँक - स्थापना.

१९८८: इंटरमीडिएट-रेंज न्यूक्लियर फोर्सेस ट्रीटी - अंमलात आली.

१९८०: केबल न्यूज नेटवर्क (CNN) - प्रसारण सुरु केले.

१९६४: केनिया - देश प्रजासत्ताक बनला.

१९६१: कॅनेडियन इम्पीरियल बँक ऑफ कॉमर्स - कॅनेडियन बँक ऑफ कॉमर्स आणि इम्पीरियल बँक ऑफ कॅनडाचे विलीनीकरण, कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठी बँक विलीनीकरण, यातून कॅनेडियन इम्पीरियल बँक ऑफ कॉमर्सची स्थापना.

आज यांचा जन्म

१९८५: दिनेश कार्तिक - भारतीय क्रिकेटपटू

१९७०: आर. माधवन - हिंदी चित्रपट अभिनेते

१९६५: नायगेल शॉर्ट - इंग्लिश बुद्धिबळपटू

१९५३: हरिभाऊ माधव जावळे - भारतीय राजकारणी (निधन: १६ जून २०२०)

१९४९: गुम्मडी कुथुहलम्मा - भारतीय राजकारणी, आंध्र प्रदेशचे आमदार (निधन: १५ फेब्रुवारी २०२३)

१९४७: रॉन डेनिस - मॅक्लारेन ग्रुपचे संस्थापक

१९३७: राम अवधेशसिंग यादव - भारतीय राजकारणी व सामाजिक न्याय नेते (निधन: २० जुलै २०२०)

१९३६: नील पवन बरुआ - भारतीय चित्रकार (निधन: २८ ऑक्टोबर २०२२)

१९२९: नर्गिस दत्त - हिंदी चित्रपट अभिनेत्री (निधन: ३ मे १९८१)

१९२९: पालोनजी मिस्त्री - भारतीय वंशाचे आयरिश उद्योगपती, शापूरजी पालोनजी समूहाचे अध्यक्ष - पद्म भूषण (निधन: २८ जून २०२२)

१९२८: जॉर्जी डोब्रोव्होल्स्की - सोव्हिएत अंतराळवीर, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्हिक्टर पटसायेव यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती (निधन: २९ जून १९७१)

१९२६: मर्लिन मन्रो - अमेरिकन अभिनेत्री (निधन: ५ ऑगस्ट १९६२)

१९०७: फ्रँक व्हाईट - जेट इंजिन विकसित करणारे (निधन: ९ ऑगस्ट १९९६)

१८७२: कवी बी - मराठी कवी (निधन: ३० ऑगस्ट १९४७)

१८४३: हेन्री फॉल्स - फिंगरप्रिंटिंगचे जनक (निधन: २४ मार्च १९३०)

१८४२: सत्येंद्रनाथ टागोर - पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) (निधन: ९ जानेवारी १९२३)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: यदुनाथ बास्के - भारतीय राजकारणी आणि आदिवासी नेते

२००६: माधव गडकरी - लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार

२००२: हॅन्सी क्रोनिए - दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू (जन्म: २५ सप्टेंबर १९६९)

२००१: वीरेंद्र - नेपाळचे राजे (जन्म: २८ डिसेंबर १९४५)

२०००: मधुकर महादेव टिल्लू - एकपात्री कलाकार

१९९९: ख्रिस्तोफर कॉकेरेल - होव्हर्क्राफ्टचे निर्माते (जन्म: ४ जून १९१०)

१९९८: गो. नी. दांडेकर - ज्येष्ठ साहित्यिक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ८ जुलै १९१६)

१९९६: नीलम संजीव रेड्डी - भारताचे ६ वे राष्ट्रपती (जन्म: १९ मे १९१३)

१९८७: के. ए. अब्बास - दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार (जन्म: ७ जून १९१४)

१९८४: नाना पळशीकर - हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते

१९६८: हेलन केलर - अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका (जन्म: २७ जून १८८०)

१९६२: अडॉल्फ आयचमन - जर्मन नाझी सेनापती

१९६०: पॉड हिटलर - जर्मन-ऑस्ट्रियन बहीण (जन्म: २१ जानेवारी १८९६)

१९४४: महादेव विश्वनाथ धुरंधर - भारतीय चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट (जन्म: १८ मार्च १८६७)

१९३४: श्रीपादकृष्ण कोल्हटकर - प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक (जन्म: २९ जून १८७१)

१८७२: जेम्स गॉर्डन बेनेट - न्यूयॉर्क हेरॉल्डचे स्थापक (जन्म: १ सप्टेंबर १७९५)

१८४१: निकोलस एपर्टीट - कॅनिंगचे निर्माते (जन्म: १७ नोव्हेंबर १७४९)

१८३०: स्वामीनारायण - भारतीय धार्मिक नेते (जन्म: ३ एप्रिल १७८१)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com