दिनविशेष 02 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 02 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 02 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 02 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९७१: इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.

१९६२: ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.

१९५७: गोवा मुक्तीसंग्राम नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.

१९४३: दुसरे महायुद्ध स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात झाली.

१९३३: ऍडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.

१८४८: कॅलिफोर्निया गोल्ड रश सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.

आज यांचा जन्म

१९७९: शमिता शेट्टी - अभिनेत्री

१९५८: तुलसी तंती - भारतीय अक्षय ऊर्जा कार्यकारी, सुझलॉनचे संस्थापक (निधन: १ ऑक्टोबर २०२२)

१९२५: जीत सिंग नेगी - आधुनिक घरवल लोकसंगीताचे जनक (निधन: २१ जून २०२०)

१९२३: ललित नारायण मिश्रा - भारतीय रेल्वेमंत्री आणि राजकारणी (निधन: ३ जानेवारी १९७५)

१९२२: कुंवर दिग्विजय सिंग - भारतीय फील्ड हॉकीपटू (निधन: २७ मार्च १९७८)

१९१९: एम. सी. नंबुदरीपद - भारतीय लेखक आणि अनुवादक (निधन: २६ नोव्हेंबर २०१२)

१९१५: खुशवंत सिंग - भारतीय पत्रकार आणि लेखक (निधन: २० मार्च २०१४)

१९०५: ऍना रँड - रशियन-अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या (निधन: ६ मार्च १९८२)

१८९७: हॉवर्ड डीरिंग जॉन्सन - हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक (निधन: २० जून १९७२)

१८९२: टोचीगीयामा मोरिया - जपानी सुमो कुस्तीपटू, २७वे योकोझुना (निधन: ३ ऑक्टोबर १९५९)

१८८४: डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर - ज्ञानकोशकार (निधन: १० एप्रिल १९३७)

१८५६: स्वामी श्रद्धानंद - भारतीय गुरु, गुरुकुल कांग्री विश्वविद्यालयाचे संस्थापक (निधन: २३ डिसेंबर १९२६)

१७५४: चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड - फ्रान्सचे पंतप्रधान (निधन: १७ मे १८३८)

आज यांची पुण्यतिथी

२०२३: सागर - भारतीय चित्रपट दिग्दर्शक

२०२३: के. विश्वनाथ - भारतीय चित्रपट दिग्दर्शक - पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: १९ फेब्रुवारी १९३०)

२००८: जोशुआ लेडरबर्ग - अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि अनुवंशशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (जन्म: २३ मे १९२५)

२००७: विजय अरोरा - हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेते (जन्म: २७ डिसेंबर १९४४)

१९८७: ऍलिएस्टर मॅकलिन - स्कॉटिश साहसकथा लेखक (जन्म: २१ एप्रिल १९२२)

१९७०: बर्ट्रांड रसेल - ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार (जन्म: १८ मे १८७२)

१९७०: बर्ट्रांड रसेल - ब्रिटिश गणितज्ञ, इतिहासकार, आणि तत्त्वज्ञ - नोबेल पारितोषिक (जन्म: १८ मे १८७२)

१९४१: रामचंद्र शुक्ला - भारतीय इतिहासकार आणि लेखक (जन्म: ४ ऑक्टोबर १८८४)

१९३०: वासुदेव गोविंद आपटे - लेखक, निबंधकार व कोशकार (जन्म: १२ एप्रिल १८७१)

१९१७: महर्षी अण्णासाहेब पटवर्धन - लोकमान्य टिळकांचे मित्र आणि विख्यात वैद्य (जन्म: ४ मे १८४७)

१९०७: दिमित्री मेंदेलिएव्ह - रशियन रसायनशास्त्रज (जन्म: ८ फेब्रुवारी १८३४)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com