दिनविशेष 03 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 03 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

एप्रिल महिना सुरू झाला आहे, तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 03 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 03 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१०: ऍपल कंपनी ने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली.

२०००: आयएनएस आदित्य - इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.

१९७५: बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्हविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव्ह हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.

१९७३: मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाइल कॉल केला.

१९४८: ओरिसा उच्च न्यायालय - सुरवात.

आज यांचा जन्म

१९६५: नाझिया हसन - पाकिस्तानी पॉप गायिका (निधन: १३ ऑगस्ट २०००)

१९६२: जयाप्रदा - चित्रपट अभिनेत्री

१९५५: हरिहरन - सुप्रसिद्ध गायक - पद्मश्री

१९४९: रामा नारायणन - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: २२ जून २०१४)

१९३४: जेन गुडॉल - इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ

१९३०: हेल्मुट कोल्ह - जर्मन चॅन्सेलर

१९१४: फील्ड मार्शल सॅम माणेकशा - ७वे लष्करप्रमुख (चीफ ऑफ मिलटरी स्टाफ) - पद्म विभूषण, पद्म भूषण (निधन: २७ जून २००८)

१९०४: रामनाथ गोएंका - इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक (निधन: ५ ऑक्टोबर १९९१)

१९०३: कमलादेवी चट्टोपाध्याय - भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या - रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २९ ऑक्टोबर १९८८)

१९००: कॅमिल चामून - लेबनॉन देशाचे ७वे अध्यक्ष (निधन: ७ ऑगस्ट १९८७)

१८९८: हेन्री लुस - टाईम मॅगझिनचे सहसंस्थापक (निधन: २८ फेब्रुवारी १९६७)

१८८२: द्वारकानाथ पितळे - सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार (निधन: २१ जून १९२८)

१७८१: स्वामीनारायण - भारतीय धार्मिक नेते (निधन: १ जून १८३०)

आज यांची पुण्यतिथी

२०१२: गोविंद नारायण - भारतीय राजकारणी (जन्म: ५ मे १९१६)

१९९८: मेरी कार्टराइट - इंग्लिश गणितज्ञ (जन्म: १७ डिसेंबर १९००)

१९९८: हरकिसन मेहता - प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार

१९८५: डॉ. वासुदेव विष्णू मिराशी - महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक (जन्म: १३ मार्च १८९३)

१९८१: जुआन पेप्पे - पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेजचे स्थापक (जन्म: २७ जून १८९९)

१६८०: छत्रपती शिवाजी महाराज - मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि पहिले छत्रपती (जन्म: १९ फेब्रुवारी १६३०)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com