दिनविशेष 05 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 05 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 05 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 05 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००४: पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.

२००३: भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावलानाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.

१९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.

१९५८: ७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.

१९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.

१९४८: गांधी वधानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.

१९४५: दुसरे महायुद्ध जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले.

१९२२: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.

१९१९: चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.

१७६६: माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट.

१६७०: सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली.

१२९४: अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.

आज यांचा जन्म

१९७६: अभिषेक बच्चन - भारतीय अभिनेते

१९४८: नीला सत्यनारायणन - महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त (निधन: १६ जुलै २०२०)

१९३६: बाबा महाराज सातारकर - भारतीय कीर्तनकार

१९३३: गिरीजा कीर - लेखिका आणि कथाकथनकार

१९२४: दुर्यसामी सायमन लौरडुसामी - भारतीय कार्डिनल (निधन: २ जून २०१४)

१९१९: खुर्शिद आलम खान - भारतीय राजकारणी (निधन: २० जुलै २०१३)

१९०५: अच्युतराव पटवर्धन - स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक आणि सामाजिक कार्यकर्ते (निधन: ५ ऑगस्ट १९९२)

आज यांची पुण्यतिथी

२०२३: जनरल परवेझ मुशर्रफ - पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ११ ऑगस्ट १९४३)

२०२३: टी. पी. गजेंद्रन - भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते

२०१०: सुजित कुमार - चित्रपट अभिनेते व निर्माते (जन्म: ७ फेब्रुवारी १९३४)

२००८: महर्षी महेश योगी - भारतीय योगगुरू (जन्म: १२ जानेवारी १९१७)

२००३: गणेश गद्रे - ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत

२०००: कालिंदी केसकर - गायिका

१९२७: हजरत इनायत खान - हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (जन्म: ५ जुलै १८८२)

१९२०: विष्णू नरसिंह जोग - वारकरी शिक्षणसंस्था आळंदीचे संस्थापक, कीर्तनकार (जन्म: १४ सप्टेंबर १८६७)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com