दिनविशेष 05 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 05 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

जून महिना सुरू झाला आहे, तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 05 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 05 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: राफेल नदाल - यांनी १४वे फ्रेंच ओपन आणि कारकिर्दीतील विक्रमी २२वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले

२०२२: चार धाम यात्रेला जात असलेली बस उत्तरकाशीमध्ये दरीत कोसळल्याने १५ लोकांचे निधन तर ६ जखमी.

२०१५: मलेशिया देशात झालेल्या ६.० रेक्टर तीव्रतेच्या भूकंपाने रानौ, सबा, मलेशियात मोठ्या प्रमाणात भूस्खलनानंतर माउंट किनाबालूवर हायकर्स आणि माउंटन गाइड्ससह १८ लोकांचे निधन.

२००४: फ्रान्समध्ये प्रथमच दोन पुरुषांचा समलिंगी विवाह साजरा झाला.

२००३: पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.

२००१: उष्णकटिबंधीय वादळ एलिसन (Tropical Strom Alison) - अमेरिकेतील दुसरे सगळ्यात मोठे वादळ, यात किमान ५५० करोड डॉलर्स पेक्षा जास्त नुकसान.

१९९७: काँगो - देशात दुसरे प्रजासत्ताक राष्ट्रीय युद्ध सुरू झाले.

१९९५: बोस-आईनस्टाईन कंडेन्सेट - पहिल्यांदा तयार केले गेले.

१९९४: ब्रायन लारा - यांनी नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

१९८४: ऑपरेशन ब्लू स्टार - सुवर्णमंदिर, अमृतसर मध्ये घुसलेल्या अतिरेक्यांवर भारतीय सेनेने हल्ला केला.

१९८१: एड्स रोग - पहिल्यांदा एड्सची लक्षणे असणारे रुग्ण अमेरिकेत सापडले.

१९८०: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.

१९७७: सिशेल्स - देशात उठाव झाला.

१९७५: सुएझ कालवा - पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.

आज यांचा जन्म

१९७२: योगी आदित्यनाथ - भारतीय पुजारी, उत्तर प्रदेशचे २१वे मुख्यमंत्री

१९६१: रमेश कृष्णन - भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक - पद्मश्री

१९६१: बिष्णू सेठी - भारतीय लेखक आणि राजकारणी, ओडिशाचे आमदार (निधन: १९ सप्टेंबर २०२२)

१९४६: पॅट्रिक हेड - विल्यम्स एफ१ टीमचे सहसंस्थापक

१९०८: रवि नारायण रेड्डी - कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक (निधन: ७ सप्टेंबर १९९१)

१८८३: जॉन मायनार्ड केन्स - ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ (निधन: २१ एप्रिल १९४६)

१८८१: गोविंदराव टेंबे - भारतीय संगीतकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक (निधन: ९ ऑक्टोबर १९५५)

१८७९: नारायण मल्हार जोशी - भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक (निधन: ३० मे १९५५)

१७२३: ऍडॅम स्मिथ - स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (निधन: १७ जुलै १७९०)

आज यांची पुण्यतिथी

२००४: रोनाल्ड रेगन - अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ६ फेब्रुवारी १९११)

१९९९: सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले - राजमाता श्रीमंत छत्रपती

१९९६: कुबेर नाथ राय - भारतीय कवि आणि विद्वान आचार्य (जन्म: २६ मार्च १९३३)

१९७३: श्री गुरूजी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २रे सरसंघचालक (जन्म: १९ फेब्रुवारी १९०६)

१९५०: हरिश्चंद्र बिराजदार - कुस्तीगीर व प्रशिक्षक (जन्म: १४ सप्टेंबर २०११)

१९३५: एलिझाबेथ मॅककॉम्ब्स - न्यूझीलंड संसदेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला (जन्म: १९ नोव्हेंबर १८७३)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com