दिनविशेष 07 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 07 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

जून महिना सुरू झाला आहे, तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 07 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 07 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: USB-C - युरोपियन युनियन मधील देशांनी आणि कायदेकर्त्यांनी पहिल्यांदाच मोबाइल फोन, टॅब्लेट आणि कॅमेर्‍यांसाठी सिंगल चार्जिंग पोर्ट (USB-C) वापरण्यास सहमती दर्शविली.

२०२२: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) बिटुमिनस काँक्रीटचा ७५ किलोमीटर (किमी) लांबीचा महामार्ग १०५ तास आणि ३३ मिनिटांच्या विक्रमी वेळेत पूर्ण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे.

२०१७: म्यानमारच्या हवाई दलाचे शानक्सी Y8 हे अंदमान समुद्रात कोसळले आणि त्यातील सर्व१२२ लोकांचे निधन.

२००६: अबू मुसाब अल झरकावी यांची अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात हत्या.

२००४: शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) - राजकीय पक्षाची स्थापना.

२००१: युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.

२०००: ब्लू लाइन - संयुक्त राष्ट्रांनी इस्रायल आणि लेबनॉनमधील सीमा निश्चित करून दिली.

१९९४: आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.

१९९१: माउंट पिनाटुबो ज्वालामुखी उद्रेक - यामुळे ७ किलोमीटर उंच राख उडाली.

१९९१: फिलिपाइन्स - देशातील मधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.

१९८५: बोरिस बेकर - हे विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद १७व्या वर्षी जिकणारे सर्वात तरुण खेळाडू बनले.

१९८१: ऑपरेशन ऑपेरा - इस्त्रायली हवाई दलाने इराकची ओसिराक अणुभट्टी नष्ट केली.

१९७९: रशियातील कापुस्तिनयार येथून भास्कर-१ उपग्रहाचे प्रक्षेपण.

आज यांचा जन्म

१९८१: अमृता राव - मराठी चित्रपट अभिनेत्री

१९७४: महेश भूपती - भारतीय लॉन टेनिस खेळाडू - पद्मश्री

१९५५: रांजॉन घोषाल - भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि संगीतकार (निधन: ९ जुलै २०२०)

१९४२: मुअम्मर गडाफी - लिबीयाचे हुकूमशहा (निधन: २० ऑक्टोबर २०११)

१९१७: डीन मार्टिन - अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते (निधन: २५ डिसेंबर १९९५)

१९१४: के. ए. अब्बास - दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार (निधन: १ जून १९८७)

१९१३: मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष - लेखक टीकाकार (निधन: १९ एप्रिल २०१०)

१८३७: ऍलॉइस हिटलर - अडोल्फ हिटलर यांचे वडील (निधन: ३ जानेवारी १९०३)

१८११: सर जेम्स यंग सिम्पसन - स्कॉटिश वैद्य, क्लोरोफॉर्मचे भूल देणारे गुणधर्माचे संशोधक (निधन: ६ मे १८७०)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: प्रदीप भिडे - मुंबई दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तवाहक

२०२०: चिरंजीवी सर्जा - भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते (जन्म: १ ऑक्टोबर १९८४)

२०१८: शेरीफ इस्माईल - इजिप्शियन राजकारणी, पंतप्रधान (जन्म: ६ जुलै १९५५)

२००२: बी. डी. जत्ती - भारताचे ५वे उपराष्ट्रपती, हंगामी राष्ट्रपती (जन्म: १० सप्टेंबर १९१२)

२००१: व्हिक्टर पाझ एस्टेन्सोरो - बोलिव्हिया देशाचे ४५वे अध्यक्ष (जन्म: २ ऑक्टोबर १९०७)

२०००: गोपीनाथ तळवलकर - बालसाहित्यिक (जन्म: २९ नोव्हेंबर १९०७)

१९९२: बिल फ्रान्स सीनियर - नासकारचे सहसंस्थापक (जन्म: २६ सप्टेंबर १९०९)

१९९२: डॉ. स. ग. मालशे - मराठी वाङ‌्मयाचे अभ्यासक आणि संशोधक (जन्म: २४ सप्टेंबर १९२१)

१९९२: डॉ. सखाराम गंगाधर मालशे - लेखक, समीक्षक व संपादक (जन्म: २४ सप्टेंबर १९२१)

१९७८: रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड - नॉरिश रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक

१९७०: इ. एम. फोर्स्टर - ब्रिटिश साहित्यिक (जन्म: १ जानेवारी १८७९)

१९५४: ऍलन ट्युरिंग - ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ (जन्म: २३ जून १९१२)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com