दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 07 April 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 07 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०००: कोची झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर होण्याचा मान मिळाला.

१९९८: मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर हि कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.

१९९२: एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.

१९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.

१९७६: होंडा एकॉर्डा या गाडी प्रकाशित करण्यात आली.

१९५५: एअर इंडिया ची मुंबई - टोकियो विमानसेवा सुरू झाली.

१९४६: सोनी कंपनी ची स्थापना झाली.

१९०७: मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.

१८४९: जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी कलकत्ता फिमेल स्कूल सुरू केले.

आज यांचा जन्म

१९६७: राम नरेश रावत - भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार (निधन: ४ सप्टेंबर २०२२)

१९४९: गोपाल निमाजी वाहनवती - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: २ सप्टेंबर २०१४)

१९४८: नित्यानंद हळदीपूर - मैहर घराण्याचे बासरी वादक

१९३२: राज मोहन वोहरा - लेफ्टनंट जनरल - महावीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक (निधन: १४ जून २०२०)

१९२३: आत्माराम गोविंद भेंडे - मराठी नाट्यअभिनेते व दिग्दर्शक

१९१२: पन्नालाल पटेल - गुजराथी कथा-कादंबरीकार - ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ एप्रिल १९८९)

१९०९: एडविन एच लँड - पोलाराईड कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक (निधन: १ मार्च १९९१)

१८९२: जोसेफ टिटो - युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (निधन: ४ मे १९८०)

१८८०: पांडुरंग वामन काणे - भारतीय भारतशास्त्रज्ञ आणि संस्कृत विद्वान - भारतरत्न (निधन: १८ एप्रिल १९७२)

१८६१: रबिन्द्रनाथ टागोर - भारतीय कवी, पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते - नोबेल पुरस्कार (निधन: ७ ऑगस्ट १९४१)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: पार्थ घोष - पश्चिम बंगालचे वक्तृत्वकार

२००२: दुर्गाबाई भागवत - जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या (जन्म: १० फेब्रुवारी १९१०)

२००१: विभावरी शिरुरकर - लेखिका (जन्म: १८ मार्च १९०५)

२००१: प्रेम धवन - भारतीय गीतकार - पद्मश्री (जन्म: १३ जून १९२३)

१९९८: ऍलन मॅक्लिओड कॉर्मॅक - दक्षिण आफ्रिकन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (जन्म: २३ फेब्रुवारी १९२४)

१९९१: गोपाल नरहर नातूपुणे - लोककवी (जन्म: ११ नोव्हेंबर १९११)

१९९१: मनमोहन नातू - लोककवी गोपाळ नरहर तथा (जन्म: ११ नोव्हेंबर १९११)

१९८७: पॉल पोफम - अमेरिकन सैनिक आणि कार्यकर्ता, गे मेन्स हेल्थ क्रायसिसचे सहसंस्थापक (जन्म: ६ ऑक्टोबर १९४१)

१९२४: अलारी सीताराम राजू - भारतीय कार्यकर्ते (जन्म: ४ जुलै १८९७)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com